​'छोट्या पडद्या'वर दिवाळी धमाका

छोट्या पडद्यावरही प्रकाशाचे पर्व असलेल्या दिवाळीचे जोरदार सेलिब्रेशन केले जाते.

​'छोट्या पडद्या'वर दिवाळी धमाका
Published: 27 Oct 2016 04:52 PM  Updated: 27 Oct 2016 11:22 AM

दिवाळी हा सण उत्साहाचा, जल्लोषाचा आणि सुख समृद्धीचा. रोषणाई, आकाशकंदील, फराळ म्हणजे दिवाळी. सारे वातावरण मंगलमय आणि आसमंतात फक्त आनंदीआनंद म्हणजे दिपावली. वर्षातून एकदा येणा-या या दिव्यांच्या सणाच्या काळाता वातावरण आल्हाददायक झाल्याचे पाहायला मिळते. तेजपर्व दिवाळीचा हा उत्साह घरोघरी पाहायला मिळतो. याच उत्साहापासून छोटा पडदा तरी कसा दूर राहिल. छोट्या पडद्यावरही प्रकाशाचे पर्व असलेल्या दिवाळीचे जोरदार सेलिब्रेशन केले जाते.
 


रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी कलाकार मंडळी छोट्या पडद्यावरील विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून दिवाळी सण साजरा करतात. महाराष्ट्राचा महामंच 'कोण होईल मराठी करोडपती'च्या सेटवरही दिपावलीचे धमाकेदार सेलिब्रेशन करण्यात आले. या मराठमोळ्या रियालिटी शोच्या सेटवर दिग्दर्शक-अभिनेता महेश मांजरेकर आणि त्यांच्या पत्नी-अभिनेत्री मेधा मांजरेकर यांनी हजेरी लावली. या विशेष भागात मेधा मांजरेकर यांचे अनोखं रुप पाहायला मिळाले. ‘ये रातें, ये मौसम’ हे गाजलेले हिंदी गाणे महेश मांजरेकर यांच्यासाठी गाऊन जणू त्यांना पाडवा भेटच दिली. यावेळी महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर यांनी या शोचा होस्ट स्वप्नील जोशीसह विविध विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या. महाराष्ट्राचा महामंच 'कोण होईल मराठी करोडपती' या गेम शोच्या माध्यमातून मांजरेकर दाम्पत्याने तब्बल साडेसहा लाख रुपयांची मदत एका सामाजिक संस्थेसाठी केली.


 
महाराष्ट्राचा महामंच-कोण होईल मराठी करोडपती या शोचे दिवाळी सेलिब्रेशन महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर यांच्यापुरते मर्यादित राहिले नाही. कारण या शोच्या सेटवर आणखी एका मराठी सेलिब्रेटीनं हजेरी लावत दिवाळी सेलिब्रेशनला चारचाँद लावले. महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने तिचा भाऊ संदेशसह कोण होईल मराठी करोडपतीच्या सेटवर हजेरी लावली. सोनाली आणि संदेश पहिल्यांदाच या निमित्ताने एकत्र पाहायला मिळणार आहेत. दोघांनीही सेटवर भाऊबीजचे सेलिब्रेशन तर केले आहे शिवाय गरजूंना मदतही केली. 


 
छोट्या पडद्यावरील 'गणपती बाप्पा मोरया' या मालिकेतही दिवाळीचा उत्साह पाहायला मिळाला. श्रीगणेश आणि महादेव यांना पार्वती उटणे लावून अभ्यंगस्नान घालते. त्यानंतर पाडव्याच्या दिवशी पार्वती महादेवाला औक्षण करुन खीर भरवते. त्या बदल्यात महादेव पार्वतीला डमरु आणि त्रिशूल यापासून बनवलेले मंगळसूत्र भेट देतात. 'गणपती बाप्पा मोरया' या मालिकेत भाऊबीजसुद्धा तितक्याच उत्साहात साजरी झाली. भाऊबीजेच्या दिवशी गणपती कार्तिकेयची भेट घेऊन शिवालयात घेऊन जातो. तर मनसाच्या मनातली नाराजी दूर करण्यातही गणपतीला यश येते. यानंतर मनसा गणपती आणि कार्तिकेयला ओवाळत भाऊबीज साजरी करते. गणपती म्हाळसाला हिरव्या रंगाचा नागमणी भेट देतो.
 


'अस्सं सासर सुरेखबाई' या मालिकेत दिवाळी सेलिब्रेशनला आणखी एक खास कारण होते. दिवाळीच्या मुहूर्तावरच या मालिकेने चारशे भागांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे मालिकेचे सेटवर आणि कलाकारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मालिकेत जुईला एक पुरस्कारही मिळाला आहे. त्यामुळे महाजन कुटुंबीयांचा आनंद द्विगुणित झाला आहे. या मालिकेतील जुई अर्थात मृणाल दुसानिसची लग्नानंतरची ही पहिलीच दिवाळी आहे. त्यामुळे तिच्यासाठीही ही दिवाळी स्पेशल आहे.


 
'श्रावणबाळ रॉकस्टार' या मालिकेच्या टीमनेही दिवाळीचे सेलिब्रेशन करताना सर्वच कलाकारांनी भरपूर मस्ती केली. या मालिकेतील केतकी अर्थात कामिनी ही उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच उत्तम नर्तिका आहे हे जगजाहिर आहे. मात्र ती एक उत्तम गायिकासुद्धा आहे हे या दिवाळी सेलिब्रेशनमध्ये दिसून आले. सर्वांसह धम्माल मस्ती करताना तिने सुंदर गाणे गाऊन मनोरंजन केले. कामिनीप्रमाणेच संचिता अर्थात नीतूही एक उत्तम मिमिक्री आर्टिस्ट आहे. तिने यावेळी डोरेमॉन कार्टूनमधील नोबेतोच्या हुबेहूब आवाजात दिवाळी शुभेच्छा देऊन सा-यांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला.
 


'सरस्वती' या मालिकेतही दिवाळीचा उत्साहा दिसून येणार आहे. या मालिकेतील सरस्वती आणि राघव यांच्यासाठी दिवाळी खास आहे. सरस्वतीने दारात खास रांगोळी काढली, कंदील लावला. नुकतेच या मालिकेत सारा या व्यक्तीरेखेची एंट्री झाली आहे. त्यामुळे पाडव्याच्या मुहूर्तावर कोण कुणाला भेट देणार हे मात्र गुलदस्त्यात ठेवणार आहे. हा पाडवा राघव, सरस्वती आणि सारा यापैकी कुणासाठी संस्मरणीय ठरणार याकडे सा-यांचे लक्ष असेल.
  
दिवाळीचं जंगी सेलिब्रेशन छोट्या पडद्यावर होणार आहे. रसिकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलेल्या कलाकारांसोबत दिवाळीचा आनंद मनमुराद लुटण्याची संधी छोट्या पडद्यावर मिळणार आहे. मनोरंजानाचे फटाके उडवण्यासाठी सज्ज व्हा. 


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :