अंकिता भार्गवचे फोटोशूट व्हायरल,फोटो पाहून मिळतायेत अशा प्रतिक्रीया

चाहत्यांशी कनेक्ट राहाता यावे म्हणून अंकिता सतत सोशल मीडियावर तिच्या सगळ्या अपडेट शेअर करत असते.

अंकिता भार्गवचे फोटोशूट व्हायरल,फोटो पाहून मिळतायेत अशा प्रतिक्रीया
Published: 13 Jul 2017 12:31 PM  Updated: 13 Jul 2017 12:31 PM

बॉलिवूड कलाकार असो किंवा टीव्ही कलाकार असो त्यांचे ग्लॅमरस फोटोशूट तुमच्या मनात नाही भरले तरच नवल.असेच एक से बढकर एक  हटके गॉर्जिअस फोटोशूट केले आहे अंकिता भार्गव या टीव्ही अभिनेत्रीने.काही फोटोंमध्ये अंकिताने इंडियन आऊटफिट परिधान केला आहे. तर काही फोटोंमध्ये तिचा वेस्टर्न लूक पाहायला मिळतोय.फोटोंमध्ये तिचा गॉर्जियस लूक पाहून तिचे फॉलोव्हर्सही तिला चांगल्या प्रतिक्रीया देताना पाहायला मिळतायेत. सोशल मीडियावर अंकिताचे फोटो खूप व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळतंय. अंकिता ही ये है मोहब्बते मालिकेमध्ये रमन  भल्लाची भूमिका करणारा करण पटेलची पत्नी आहे.तर ज्येष्ठ कलाकार अभय भार्गव यांची अंकिता मुलगी आहे.हे फोटोशूट फक्त आवड म्हणून केल्याचा दावा अंकिताने केलाय.यामागं कोणतंही कारण करुन काहीतरी वेगळं करण्याच्या विचारानं फोटोशूट केल्याचं तिनं सांगितलंय. रसिकांना थोडी वेगळी झलक पाहायला मिळावी म्हणूनच करण्याच्या विचारात होते त्यानुसार हे फोटोशूट केले असल्याचे एका मुलाखतीत तिने म्हटले आहे. चाहत्यांशी कनेक्ट राहाता यावे म्हणून अंकिता सतत सोशल मीडियावर तिच्या सगळ्या अपडेट शेअर करत असते. त्यानुसार तिने हे फोटोशूटमधीला काही निवडक फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजेत तिचे फोटोशूट पाहून करण पटेलनेही पत्नीच्या कामावार आनंद व्यक्त केला आहे.येत्या 28 जुलैला करण आणि अंकिता यांच्या लग्नाची दुसरी अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट कऱणार आहेत. यासाठी खास करणने अंकितासाठी सरप्राईज प्लॅन केले आहे. अंकिताने 'कसौटी जिंदगी की', 'करम अपना अपना', 'दिल मिल गए' और 'ये प्यार ना होगा' यासांरख्या टीवी मालिकांमध्ये काम केले आहे. 


कंगना राणौतचा सिमरन हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :