​पेशवा बाजीरावमध्ये होणार करण सूचकची एंट्री

​पेशवा बाजीराव ही मालिका काही वर्षांचा लीप घेणार असून या मालिकेत आता करण सूचकची एंट्री होणार आहे. करण या मालिकेत मोठ्या बाजीरावाची भूमिका साकारणार आहे.

​पेशवा बाजीरावमध्ये होणार करण सूचकची एंट्री
Published: 16 May 2017 10:27 AM  Updated: 16 May 2017 10:27 AM

पेशवा बाजीराव या मालिकेत रुद्र सोनी छोट्या बाजीरावची भूमिका साकारत आहे. त्याने या भूमिकेला खूपच चांगल्या प्रकारे न्याय दिला आहे. आता या मालिकेत बाजीराव मोठा झाला असल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ही मालिका काही वर्षांचा लीप घेणार असून आता या मालिकेत मोठ्या बाजीरावची भूमिका करण सूचक साकारणार आहे. या मालिकेत बाजीराव यांची भूमिका महत्त्वाची असल्याने ही भूमिका साकारण्यासाठी चांगल्या कलाकाराच्या टीम शोधात होती. 
बाजीराव पेशवे हे त्यांच्या तल्लख बुद्धी आणि दमदार वक्तृत्वासाठी प्रसिद्ध होते. ते आपल्या सैन्याला प्रेरित करून कोणतेही युद्ध जिंकत असत अशी त्यांची ख्याती होती. त्यामुळे ही भूमिका साकारण्यासाठी छोट्या पडद्यावरील अनेक प्रसिद्ध कलाकारांचा विचार करण्यात आला होता. या भूमिकेसाठी मृणाल जैन, निकितन धीर, पल.व्ही.पुरी, हर्षद अरोरा अशा अनेक कलाकारांच्या नावांची यादी बनवण्यात आली होती. पण या सगळ्यातून करण या भूमिकेसाठी योग्य असल्याचे मालिकेच्या टीमचे म्हणणे असल्याने या भूमिकेसाठी त्याची निवड करण्यात आली. याबाबत करण सांगतो, या भूमिकेसाठी माझी निवड करण्यात आली हे मला कळल्यावर मी खूपच खूश झाले होते. ही भूमिका साकारणे हे माझ्यासाठी अभिमानस्पद आहे. एक कलाकार म्हणून खूप मोठी जबाबदारी माझ्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. पण मी या भूमिकेवर प्रचंड मेहनत घेणार आहे. या भूमिकेद्वारे मी नक्कीच प्रेक्षकांचे मन जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. 
या मालिकेची कथा, या मालिकेतील अॅक्शन दृश्ये आणि चित्तथरारक दृश्य इफेक्टस यामुळे ही मालिका सध्या प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. 


गोलमाल अगेन या वर्षातील सगळ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :