Bigg Boss 11: नंतर एवढा बदलला अर्शी खानचा लूक,पाहा PHOTO

गेल्या काही महिन्यांपासून अर्शी आपल्या फिटनेसवरही लक्ष देत होती. तिची फिटनेसवरील मेहनत या फोटोत दिसून येत आहे.तिने लूकवर मेहनत घेत स्वतःचा मेकओव्हर केला आहे.फोटोत अर्शी पूर्वीपेक्षा बरीच स्लिम झालेली पाहायला मिळत आहे.

Bigg Boss 11: नंतर एवढा बदलला अर्शी खानचा लूक,पाहा PHOTO
Published: 07 May 2018 04:46 PM  Updated: 07 May 2018 04:46 PM

झगमगत्या दुनियेत मेकओव्हर, लूक बदलणे,स्टाइल स्टेटमेंटमध्ये बदलत अनेकदा अभिनेत्रींना लगेचच कामाचा बडा प्रोजेक्ट हाती लागतात अशी अनेक उदाहरणं आहेत. मेकओव्हरमुळे बिग बॉसची एक्स कंटेस्टंट लोकेश कुमारीला तमिळ सिनेमाची ऑफर लोकेशला मिळाली होती. त्यामुळे आता असाच काहीसा प्रयत्न अर्शी खानही करताना दिसते.तिनेही नुकताच मेकओव्हर करत सा-यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.'बिग बॉस 11' मध्ये कंटेस्टंट राहिलेल्या अर्शी खानची तिच्या बोल्डनेसमुळे बरीच चर्चा झाली होती.मात्र तरीही या शोनंतर तिला काम मिळालेच नाही.कामाच्या शोधात असलेली अर्शी खान आता पुन्हा चर्चेत आली आहे.ते ही तिच्या नवीन लूकमुळे.बिग बॉसच्या घरातही तिला अनेकजण हेअर स्टाईल बदलण्याचा सल्ला देत असे. तिच्या आईनेही तिला आता लुकमध्ये अर्शीने बदल करावा असा सल्ला दिला होता. त्यानुसार आता अर्शीने आपला मेकओव्हर केल्याचे पाहायला मिळत आहे.खुद्द अर्शीनेच सोशल मीडियावर तिचे नवीन लूक असलेले फोटो शेअर केले आहेत.शेअर केलेल्या फोटोत तिच्या लूकमध्ये कमालिचा बदल झालेला पाहायला मिळत आहे.गेल्या काही महिन्यांपासून अर्शी आपल्या फिटनेसवरही लक्ष देत होती. तिची फिटनेसवरील मेहनत या फोटोत दिसून येत आहे.तिने लूकवर मेहनत घेत स्वतःचा मेकओव्हर केला आहे.फोटोत अर्शी पूर्वीपेक्षा बरीच स्लिम झालेली पाहायला मिळत आहे.हेअरस्टाइलबरोबरच ड्रेसिंगवरही लक्ष केंद्रीत केले आहे.आता तिचा हा नवीन लूक तिला नवीन संधी मिळवून देण्यात कितपत यशस्वी ठरतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 


वास्तविक अर्शी खानला ‘वादाची मलिका’ म्हटले जाते. कारण जेव्हा ती बिग बॉसच्या घरात होती, तेव्हा सातत्याने ती वादाच्या भोव-यात राहायची. तिच्याबद्दल विविध प्रकारच्या बातम्या समोर येत होत्या. बिग बॉसच्या घरात प्रियांक शर्माने तिच्यावर निशाणा साधल्यानेच, तिचे काही भूतकाळातील प्रकरणे बाहेर आले होते. ड्रामा क्वीन हिना खाननेही तिच्यावर विचित्र स्वरूपाच्या कॉमेण्ट केल्या होत्या. परंतु अर्शी खानने याची तमा न बाळगता बिग बॉसच्या घरात आपला जलवा कायम ठेवला. विकास गुप्ताबरोबरची तिचे मैत्री चर्चेचा विषय ठरली. घराबाहेर या दोघांमध्ये मैत्री कायम असल्याचे बोलले जाते. 


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :