Lokmat Maharashtra's Most Stylish Awards 2017: ब्युटी इन ब्लॅक

दैनिक लोकमतने गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उत्कंठा निर्माण करणा-या साई रिअल इस्टेट प्रस्तुत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2017 सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.

Lokmat Maharashtra's Most Stylish Awards 2017: ब्युटी इन ब्लॅक
Published: 16 Nov 2017 02:33 PM  Updated: 16 Nov 2017 02:40 PM

दैनिक लोकमतने गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उत्कंठा निर्माण करणा-या साई रिअल इस्टेट प्रस्तुत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2017 सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी  रेड कार्पेटवर अनेक सेलिब्रिटींचा स्टायलिश अंदाज बघावयास मिळाला. रेड कार्पेटवर हिंदी चित्रपटसृष्टी, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींचा ग्लॅमरस अंदाज पाहताच साऱ्यांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या. यावेळी ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये या अभिनेत्री खूपच स्टायलिश दिसत होत्या. नजर टाकूयात ब्युटी विथ ब्रेन असलेल्या स्टायलिश अभिनेत्रींवर.



सई ताम्हणकर - 
तरुणाईची  स्टाइल आयकॉन असलेली सई ताम्हणकर हिने या सोहळ्यात रेड कार्पेटवर ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये दमदार एंट्री घेतली. सईने स्टायलिश लूकमध्ये हजेरी लावत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. सईचा हा अंदाज सगळ्यांना घायाळ करणार होता.  



दिव्या दत्ता - 
ब्लॅक कलरच्या फुल स्लीव्हज असलेल्या या इंडो- वेस्टर्न आऊटफीटमध्ये दिव्याने या सोहळ्यात उपस्थिती लावली. दिव्याने ब्लॅक कलरच्या फूल गाऊनमध्ये उपस्थितांच्या नजरा आकर्षित करुन घेतल्या होत्या. 



किशोरी शहाणे -  
अभिनयाबरोबरच आपल्या स्टाइलने किशोरी शहाणे यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. किशोर शहाणे यांचा अंदाज रेड कार्पेटवर पाहाण्याजोग होता. अतिशय बिनधास्त स्टाइलमध्ये त्यांनी रेड कार्पेटवर एंट्री घेतली. 



ह्रता दुर्गुळे -
दुर्वा फेम ह्रता दुर्गुळे या खूपच सिंम्पल अँड सोबर अंदाजात दिसली.  यावेळी तिने ब्लॅक कलरचा ड्रेस गळ्यात चोकर आणि सिंम्पल हेअर स्टाइलवर रेड कार्पेटवर अवतरली होती. 

लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टाइलिश अवॉर्ड सोहळ्याचे प्रोगेस पार्टनर कार्लटन, स्टार कॉस्मेटिक्स, जॉनी वॉकर तसंच झूम,पिंक व्हिला, अफॅक्स आणि झी मराठी पार्टनर आहे. 


 


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :