Lokmat Maharashtras Most Stylish Awards 2017 : जॅकी श्रॉफचा षट्कार...! वडिलांना धोतर नेसताना पाहून स्टाईल शिकलो...!!

जॅकी श्रॉफ म्हणजे, अनेकांच्या गळ्यातील ताईत.लोकमतच्या महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2017 जॅकीने अशी काही रंगत आणली की, सगळेच खूश्श झालेत.

Lokmat Maharashtras Most Stylish Awards 2017 : जॅकी श्रॉफचा षट्कार...!  वडिलांना धोतर नेसताना पाहून स्टाईल शिकलो...!!
Published: 14 Nov 2017 10:28 PM  Updated: 14 Nov 2017 10:48 PM

जॅकी श्रॉफ म्हणजे, अनेकांच्या गळ्यातील ताईत.लोकमतच्या महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2017  जॅकीने अशी काही रंगत आणली की, सगळेच खूश्श झालेत. आपल्या चिरपिरिचित अंदाजात जॅकी ‘स्टाईल’ बद्दल भरभरून बोलला.  वडिलांना धोतर नेसताना पाहून मी स्टाईल शिकलो, असे त्याने सांगितले.  मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला जॅकी श्रॉफच्या हस्ते महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अभिनेत्री हा पुरस्कार देण्यात आला.  मग यानंतर त्याच्याशी रंगला मनमोकळा संवाद. राम राम, नमस्कार. कसे आहात...अशी मराठमोळी सुरुवात करत जॅकीने पहिल्याच शॉटमध्ये षट्कार ठोकला. तुझी स्टाईल कुठून आली ? असे विचारले असता त्याने आपल्या स्टाईलबद्दलचा उलगडा केला.  लहानपणी वडिलांना धोतर नेसताना पाहिले आणि त्यांची ती स्टाईल अवगत केली. प्रत्येकाची स्टाईल वेगळी असते आणि त्यातच वेगळपण असते, असे त्याने सांगितले.
या पुरस्कार सोहळ्याचे हे दुसरे वर्ष आहे. साई रिअल इस्टेट प्रस्तुत या सोहळ्याची गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उत्कंठा निर्माण झाली होती.  मुंबईतील ताज लँडस् एण्ड हॉटेलमध्ये अतिशय स्टायलिश अंदाजात हा सोहळा सुरु आहे. सोहळ्यात चारचाँद लावण्यासाठी बॉलीवुडसह मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक स्टायलिश सेलिब्रिटी उपस्थित आहेत. त्याचबरोबर सामाजिक, राजकीय, आर्थिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांचीही उपस्थिती आहे. 
 


गोलमाल अगेन या वर्षातील सगळ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :