Zindagi Virat Movie Review:पचनी न पडणारी भरकटलेली ‘विराट’ गोष्ट !

Zindagi Virat Movie Review:पचनी न पडणारी भरकटलेली ‘विराट’ गोष्ट ! विषयी आणखी काही

  • भाषा - मराठी कलाकार - किशोर कदम,अतुल परचुरे,भाऊ कदम, उषा नाईक,ओम भूतकर, निनाद गोरे
  • निर्माता - अंजनेय साठे एंटरटेनमेंट दिग्दर्शक - सुमित संघमित्र
  • Duration - 2तास30 Genre - ड्रामा
cnx masti rating
Readers rating
Readers review
(0)

Editors review

Zindagi Virat Movie Review:पचनी न पडणारी भरकटलेली ‘विराट’ गोष्ट !

सुवर्णा जैन

एक ना धड भाराभर चिंध्या ही म्हण आपण ऐकलीच आहे. अशीच काहीशी गत 'जिंदगी विराट' या मराठी सिनेमाची झाली असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. बाप-लेकाचं भावनिक नातं दाखवताना कधी कॉमेडी, कधी प्रेमाचा अँगल दाखवण्याचा प्रयत्न आणि आजच्या आधुनिक काळाशी विसंगत कथा यामुळे जिंदगी विराट सिनेमाची कथा म्हणजे भरकटलेली विराट गोष्ट असं म्हणावं लागेल.


महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात जिंदगी विराट या सिनेमाची कथा रंगते. पितृपक्ष पंधरवड्यात पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी पिंडाला कावळा शिवणे या विधीला महत्त्व आहे. जिंदगी विराट या सिनेमात संतोष (ओम भूतकर) याचे वडिल दत्ताबा (किशोर कदम) यांचं निधन होतं. दत्ताबाच्या निधनानंतर त्यांच्या पिंडाला कावळा काही शिवत नाही. त्यावेळी संतोष जोशीबुआ (अतुल परचुरे) यांच्याकडे धाव घेतो. त्यावेळी तुझ्या वडिलांची अखेरची इच्छा पूर्ण होणार नाही तोवर त्यांच्या आत्म्यास शांतता लाभणार नाही असं जोशीबुआ त्याला सांगतात. त्यानंतर संतोषला त्याच्या स्वप्नात दत्ताबा येतात आणि सांगतात की आपला वाढदिवस ग्रँड पद्धतीने साजरा करण्याची इच्छा होती. ती काही पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे आपल्या वडिलांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांची जन्मतारीख काय, ही तारीख शोधण्यासाठी त्याला कशाप्रकारे संघर्ष करावा लागतो, त्या काळात त्याला कोण कोणत्या व्यक्ती भेटतात, दत्ताबाच्या आत्म्याला शांती मिळते का या सगळ्याचं उत्तर या दोन तासाच्या विराट जिंदगी या सिनेमात मिळतं. या सिनेमाची कथा, दिग्दर्शक, पटकथा, संवाद आणि अभिनय अशा सगळ्या जबाबदा-या सुमित संघमित्र यांनी निभावल्या आहेत. सिनेमाचा पूर्वांध वेगाने पुढे जातो मात्र धीम्या गतीच्या उत्तरार्धात कथा रेंगाळते. या सिनेमात किशोर कदम यांनी साकारलेला दत्ताबा आणि अतुल परचुरेंचा जोशीबुआ लक्षवेधी आणि लक्षात राहतो. ओम भूतकरनं लेकाच्या म्हणजेच संतोषच्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. मात्र सिनेमातील संतोषपेक्षा सुमित संघमित्रने साकारलेला आसिफ आपल्या कॉमेडीने भाव खाऊन जातो. त्यांची जय-वीरुसारखी मैत्री रसिकांना काही भावते. भाऊ कदम आणि उषा नाईक यांनी आजवर साकारलेल्या भूमिकेच्या तुलनेत या सिनेमा फार काही करण्याची संधीच मिळालीच नसल्याचं वारंवार जाणवतं. या सिनेमाची जमेची बाजू म्हणजे यातील गाणी. मंदार चोळकर, सूरज-धीरज यांच्या शब्दांना सोनू निगम, श्रेया घोषाल, विशाल दादलानी आणि जावेद अली यांच्या सारख्या गायकांचे सूर आणि त्याला सूरज-धीरजचं लाभलेलं संगीत रसिकांच्या ओठावर राहतं. सिनेमाची गाणी रसिकांच्या ओठावर रेंगाळतात. या सिनेमाचं शुटिंग नाशिकमधल्या गावात झालं आहे. सिनेमातील लोकेशन्स काही काळ तुम्हाला प्रेमातही पाडतात. सुमित संघमित्रने सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे. मात्र कथेतच दम नसल्याने दिग्दर्शक म्हणूनही फार वेगळेपण दाखवण्याची संधी सुमित संघमित्रला लाभली नाही. या सिनेमाच्या निमित्ताने बॉलिवूडचे मोगॅम्बो अमरीश पुरी यांचे नातू अंजनेय साठे यांनी मराठीत पाऊल ठेवले आहे. त्यांची निर्मिती असलेला हा पहिला सिनेमा आहे. मात्र बाप-लेकाचं नातं दाखवण्यासाठी मांडलेली कथा आजच्या काळात न पटणारी वाटते. आजच्या वैज्ञानिक, स्मार्ट फोन आणि गॅझेटच्या युगात पिंडदानसारख्या विषयावरील सिनेमाची कथा तरुणाईसह सामान्य रसिकांच्या पचनी न पडणारी अशीच आहे.  

RELATED VIDEOS

Write A Review

Rate the movie

Readers Review

  • Be the first person to review this movie!

गोलमाल अगेन या चित्रपटाबाबत उत्सुक आहात का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :