सिया के रामची सफर

सिया के राम या मालिकेचे चित्रीकरण हैद्राबाद येथील रामोजी सिटीमध्ये सुरू आहे. या मालिकेच्या सेटवरची एक खास सफर तुमच्यासाठी...

सिया के रामची सफर
Published: 27 Jul 2016 05:16 PM  Updated: 27 Jul 2016 05:18 PM

सिया के राम या मालिकेचे चित्रीकरण हैद्राबाद येथील रामोजी सिटीमध्ये सुरू आहे. या मालिकेच्या सेटची एक खास सफर तुमच्यासाठी...

सिया के राम या मालिकेतील सगळेच कलाकार गेल्या कित्येक महिन्यांपासून हैद्राबादमध्येच ठाण मांडून बसले आहेत. या मालिकेचे एकूण चार सेट रामोजी सिटीमध्ये आहेत. हा सेट बनवण्याचा खर्च जवळजवळ १०० कोटीहूनही अधिक झालेला आहे. या सेटमधील रावणाचा महाल, रावणाचे सिंहासन हे तर प्रचंड मोठे आहे. हे सिंहासन इतके मोठे आहे की, दूरून पाहिल्यास सिंहासनावर बसलेला रावण हा खूपच छोटा वाटतो.




सिया के राम या मालिकेच्या सेटवर आम्ही पोहोचलो तेव्हा सीताहरणाचे चित्रीकरण सुरू होते. सीताहरणाच्यावेळी रावणाला पाहून सीता घाबरते आणि ती पळत सुटते असे दृश्य चित्रीत करायचे होते. पण यावेळी पळताना सीतेची भूमिका साकारणारी मदिराक्षी मुंडळे हिला दुखापत झाली. पण त्याही अवस्थेत ती चित्रीकरण करत होती. केवळ चित्रीकऱणाच्या दरम्यान मिळत असलेल्या वेळेत व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाऊन आराम करत होती. या चित्रीकरणानंतर जटायूच्या वधाचे चित्रीकरण करण्यात आले. याचे चित्रीकरण क्रोमामध्ये केले जात होते. चित्रीकरणानंतर त्यात स्पेशल इफेक्ट दिले जाणार होते.  



रावणाची भूमिका साकारणारा अभिनेता कार्तिक जयराम हा चित्रीकरणाच्यावेळी जवळजवळ २५ किलोचे कपडे आणि आभूषणे घालतो. रावणाचे मुकूटच जवळजवळ पाच किलोचे आहे. प्रेक्षकांना मालिका पाहाताना ही आभूषणे, मुकूट खोटी आहेत असे वाटू नये यासाठी इतक्या वजनाची वस्त्रं आणि आभूषणे मी घालतो असे कार्तिक सांगतो.



सीतेचे अपहरण केल्यानंतर रावण तिला लंकेत घेऊन येतो आणि अशोकवाटीका येथे आणून ठेवतो. या अशोकवाटीकाचा सेट संपूर्ण तयार झालेला असून लवकरच येथे चित्रीकरण सुरू केले जाणार आहे. ही अशोकवाटीका खूपच चांगल्यारितीने बनवण्यात आली आहे. 
 


पद्मावती चित्रपटाला होत असलेला विरोध योग्य आहे असे तुम्हाला वाटते का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :