सई ताम्हणकर  सांगणार तिचा फॅशन मंत्रा!   

२०१८ मध्ये सई ताम्हणकर वर्षाच्या सुरुवातीलाच तिच्या चाहत्यांसाठी 'राक्षस' हा एक वेगळ्या कन्सेप्टचा चित्रपट घेऊन येतेय. २०१७ च संपूर्ण वर्ष सई सिल्वर स्क्रीन पासून दूर राहिली, तरी तिचे वर्षभराचे सगळेच पब्लिक अँपिअरन्सेस ग्लॅमरस आणि स्टयलिश राहिले

 सई ताम्हणकर  सांगणार  तिचा फॅशन मंत्रा!   
Published: 01 Jan 2018 09:19 AM  Updated: 01 Jan 2018 09:19 AM

      २०१८ मध्ये सई  ताम्हणकर  वर्षाच्या सुरुवातीलाच तिच्या चाहत्यांसाठी 'राक्षस' हा एक वेगळ्या कन्सेप्टचा चित्रपट घेऊन येतेय. २०१७ च संपूर्ण वर्ष सई सिल्वर स्क्रीन पासून दूर राहिली, तरी तिचे वर्षभराचे सगळेच पब्लिक अँपिअरन्सेस ग्लॅमरस आणि स्टयलिश राहिलेत. सईच्या ह्या अपडेटेड स्टाईल स्टेटमेंटची दाखल नक्कीच  घेतली गेली जेव्हा सईला 'लोकमत मोस्ट स्टायलिश दिवा' हा अवॉर्ड दिला गेला. २०१७  फेमिना फॅशन नाईटची शो स्टॉपर म्हणून तिने आपलं फॅशन जगतातलं वजन नक्कीच वाढवलं. 

                सईचं हे वर्ष नक्कीच स्टाईलच्या बाबतीत नक्कीच वैविध्यपूर्ण राहिलं, सईने २०१७ च्या संपूर्ण वर्षात कोणकोणत्या प्रकारचे वैविध्यपूर्ण पोशाख वापरले हे  जाणून घेण्यासाठी तिचे २०१७ चे सगळे कॉस्ट्यूम्स एकत्र पाहाता येतील असं  'लुक बुक' इंटरनेटवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 'सई ताम्हणकर लुक बुक ऑफ २०१७' पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा:- http://www.dreamerspr.com/saitamhankarlookbook/


              सईला तिच्या पूर्ण वर्षाच्या फॅशन स्टेटमेंट बद्दल विचारलं असता सई  म्हणाली, "२०१७चा  फॅशन अजेन्डा असं काही नव्हतं, पण सांगायचं झालंच  तर 'Be Comfortable yet Glamorous' ! खरंतर, अशी काही कन्सेप्ट, किंवा थॉट यामागे नव्हता, मला कम्फर्टेबल वाटतील, छान दिसतील, आणि माझ्या पर्सनलीटीला सूट होतील असे कपडे घालायला नेहमीच आवडतात. थोडक्यात 'Go with the flow' हा माझा नेहमीचा मंत्रा आहे तोच मी फॅशन बाबतीत हि फॉलो केलाय."

ALSO READ :  SEE PICS:फेमिनामध्ये सई ताम्हणकरचा जलवा,व्हाईट गाऊनमध्ये दिसली ग्लॅमरस


               २०१८ मध्ये सई 'राक्षस' या तिच्या आगामी चित्रपटातून शरद केळकर सोबत पहिल्यांदा दिसणार आहे. सिनेमाची कथा कौटुंबिक पार्श्वभूमीवर बेतलेली असून थ्रिलर सस्पेन्स देखील पाहायला मिळणार आहे. 'राक्षस' चित्रपट २३ फेब्रुवारीला ला प्रदर्शित होणार आहे.   राक्षस सिनेमाचं पोस्टर काही दिवसांपूर्वी रिलीज  करण्यात आले आणि प्रेक्षकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. आता पर्यंत सईने अनेक कलाकारांसोबत काम केले आहे त्यात सई-स्वप्नील ही जोडी प्रेक्षकांना फार आवडली, परंतु पहिल्यांदाच सई ताम्हणकर आणि शरद केळकर ह्या चित्रपटातून एकत्र काम करताना दिसतील. 


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :