​प्रसाद ओक दिग्दर्शित ‘कच्चा लिंबू’चा टीझर प्रदर्शित!

​प्रसाद ओक दिग्दर्शित ‘कच्चा लिंबू’चा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटात रवी जाधव, सोनाली कुलकर्णी, मनमीत पेम प्रमुख भूमिकेत आहेत तर सचिन खेडेकर, अनंत महादेवन यांची देखील या चित्रपटात विशेष भूमिका आहे.

​प्रसाद ओक दिग्दर्शित ‘कच्चा लिंबू’चा टीझर प्रदर्शित!
Published: 11 Jul 2017 10:22 AM  Updated: 11 Jul 2017 10:27 AM

‘साध्या माणसांची स्पेशल गोष्ट’ या आगळ्या वेगळ्या टॅग लाईनमुळे उत्सुकतेचा विषय ठरलेल्या ‘कच्चा लिंबू’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. आपण सगळेच सुखाच्या शोधात असतो. आपल्या आयुष्याकडून साध्या सरळ अपेक्षा असतात. पण कधी कधी वरच्याच्या मनात आपल्यासाठी काही वेगळेच प्लॅन असतात आणि मग अचानक हे साधे, सरळ वाटणारे आयुष्य स्पेशल होऊन जाते. या अनपेक्षितपणे आलेल्या वळणाला हसतमुखाने सामोरे जाणे म्हणजेच आयुष्य जगणं असतं. असेच साधे सरळ पण तितकेच ‘स्पेशल’ असणारे काटदरे कुटुंब आपल्याला प्रसाद ओक दिग्दर्शित ‘कच्चा लिंबू’च्या टीझरमध्ये दिसते.    
स्वरूप रिक्रिएशन अँड मीडिया प्रा. लि. प्रस्तुत आणि टीमवर्क अल्ट्रा क्रिएशन्स आणि मंदार देवस्थळी निर्मित कच्चा लिंबू या चित्रपटामध्ये आयुष्याच्या खेळामध्ये कच्चा लिंबू ठरून देखील हसत खेळत आयुष्य स्पेशल बनवणाऱ्या काटदरे कुटुंबियांच्या रूपात रवी जाधव, सोनाली कुलकर्णी, मनमीत पेम हे कलाकार प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून सचिन खेडेकर, अनंत महादेवन यांची देखील या चित्रपटात विशेष भूमिका आहे. 
प्रसाद ओकचे दिग्दर्शन, रवी जाधवची प्रमुख भूमिका आणि चित्रपटाचा ब्लॅक अँड व्हाईट लुक यामुळे चर्चेत असणारा ‘कच्चा लिंबू’ येत्या ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.
रवी जाधवने नटरंग, टाइमपास यांसारख्या हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. कच्चा लिंबू या चित्रपटाद्वारे तो पहिल्यांदाच अभिनयक्षेत्रात पदार्पण करत आहे तर प्रसाद ओकने आजवर आपल्या अभिनयाने अनेक प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्याने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
कच्चा लिंबू या चित्रपटाची गेल्या कित्येक महिन्यांपासून चर्चा सुरू आहे.



Also Read : ‘कलरफुल्ल’ जमान्यात ब्लॅक एंड व्हाईट ‘कच्चा लिंबू’


पुन्हा फुलणार का सलमान खान आणि कतरिना कैफची लव्हस्टोरी?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :