दशक्रिया या चित्रपटाची अमेरिकेतही घेतली गेली दखल

दशक्रिया या चित्रपटाची अमेरिकेतील radiochai.com या रेडिओ वाहिनीने दखल घेत दिग्दर्शक संदीप भालचंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधून सविस्तर चर्चा करून हा चित्रपट अमेरिकेत प्रदर्शित करण्याविषयीची मागणी केली आहे.

दशक्रिया या चित्रपटाची अमेरिकेतही घेतली गेली दखल
Published: 21 Nov 2017 11:13 AM  Updated: 21 Nov 2017 11:13 AM

'दशक्रिया' या बहुचर्चीत चित्रपटाने महाराष्ट्रातील रसिकांच्या पसंतीस खरे उतरत सर्वत्र 'हाऊसफुल्ल'चा पल्ला पार करीत 'सुपरहिट'चा किताब पटकावला आहे. महाराष्ट्रातील तमाम रसिकांनी या चित्रपटाला होणारा विरोध डावलून चित्रपटगृहात जाऊन नुसता चित्रपट पहिला नाही तर प्रसंगी या चित्रपटाच्या खेळांसाठी चित्रपटगृह चालक-मालक यांची समजूत काढत हा चित्रपट दाखविण्याचा हट्ट धरला. 'दशक्रिया'वर होणाऱ्या अन्यायाला त्यांनी वाचा फोडली. त्यामुळे चित्रपटाच्या यशाचे खरे मानकरी हे मायबाप रसिक प्रेक्षक असल्याची भावना चित्रपटाचे दिग्दर्शक संदिप भालचंद्र पाटील, लेखक बाबा भांड, पटकथा, संवाद, गीत, प्रस्तुतकर्ते संजय कृष्णाजी पाटील, निर्मात्या कल्पना विलास कोठारी यांनी व्यक्त केले आहे.
‘दशक्रिया’ चित्रपटाबाबत होत असलेली चर्चा, त्याला मिळत असलेला रसिकांचा प्रतिसाद आणि चित्रपटाचा वेगळा विषय इत्यादी गोष्टींची चर्चा जगभरात सुरू असून त्याची दखल अमेरिकेतील radiochai.com या रेडिओ वाहिनीने घेत दिग्दर्शक संदीप भालचंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधून सविस्तर चर्चा करून हा चित्रपट अमेरिकेत प्रदर्शित करण्याविषयीची मागणी केली आहे. तेथील radiochai.com या रेडिओ वाहिनीवर ‘दशक्रिया’ चित्रपटाच्या कथानकावर आधारित कार्यक्रमाचे आयोजन करून चित्रपटाची सविस्तर माहिती अमेरिकन आणि तेथील भारतीय नागरिकांना करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.  
चित्रपटाच्या ट्रेलरवर काही मंडळींनी आक्षेप घेतल्याने झालेल्या गदारोळामुळे काही चित्रपट चालकांनी हा चित्रपट प्रदर्शित करण्यास नकार दिला होता. पण त्याला रसिकांनीच तोडीस तोड उत्तर देत हा चित्रपट सुरळीत सुरू राहावा यासाठी विशेष प्रयत्न केले. या चित्रपटाने विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांसोबतच तीन राष्ट्रीय व ११ महाराष्ट्र राज्य पुरस्कारांवर नाव कोरले आहे. 'दशक्रिया' मध्ये धर्मश्रद्धेच्या नावाखाली चालणाऱ्या लुबाडणुकीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी सर्व जाती धर्माची माणसे एका पातळीवर कसे वावरतात याचे यथार्थ चित्रण या चित्रपटातून घडते. ‘दशक्रिया’ची मूळ कथा ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांच्या राज्य पुरस्कार प्राप्त 'दशक्रिया' या साहित्यकृतीवर आधारित आहे. 'दशक्रिया' या चित्रपटातून आजच्या दांभिक समाजव्यवस्थेसोबतच वैचारिक जीवनाचे वास्तव दाखवीत जीवन आणि मरणाच्या दोन्ही बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळतात.
या चित्रपटात जेष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, मनोज जोशी, अदिती देशपांडे, मिलिंद शिंदे, मिलिंद फाटक, उमा सरदेशमुख, अाशा शेलार, बालकलाकार आर्या आढाव, विनायक घाडीगावकर यांच्यासह जवळपास १५० नवोदितांना अभिनयाची संधी मिळाली असून विनोदी अभिनेते आनंदा कारेकर, जयवंत वाडकर आणि कल्पना कोठारी यांनी विशेष भूमिका साकारल्या आहेत.

Also Read : दिलीप प्रभावळकर आणि मनोज जोशी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या दशक्रिया या चित्रपटाच ट्रेलर लाँच​

 मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :