“सायकल” लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

वायकॉम18 मोशन पिक्चर्सने आज त्यांचा आगामी मराठी सिनेमा सायकलच्या प्रदर्शनाची तारीख ४ मे २०१८ ही जाहीर केली. या हलक्या फुलक्या कथेमुळे तुम्ही तुमचा स्वतःचा शोध घेण्याचा प्रवास सुरू कराल.

“सायकल” लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Published: 15 Mar 2018 09:27 AM  Updated: 15 Mar 2018 09:27 AM

वायकॉम18 मोशन पिक्चर्सने आज त्यांचा आगामी मराठी सिनेमा सायकलच्या प्रदर्शनाची तारीख ४ मे २०१८ ही जाहीर केली. या हलक्या फुलक्या कथेमुळे तुम्ही तुमचा स्वतःचा शोध घेण्याचा प्रवास सुरू कराल. कॉफी आणि बरंच काही, अँड जरा हटके आणि हंपी सारख्या गाजलेल्या सिनेमांचे दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केलेला आहे. एमएफए आणि थिंक व्हाय नॉट च्या सहयोगाने हॅपी माइंड द्वारा निर्मित सायकल चे सादरीकरण वायकॉम18 मोशन पिक्चर्सने केले आहे. हृषिकेश जोशी, प्रियदर्शन जाधव आणि भालचंद्र कदम हे कलाकार या सिनेमात प्रमुख भूमिका साकारत आहेत. 

वायकॉम18 मोशन पिक्चर्सचे सीओओ, अजित पंधारे म्हणाले, “वायकॉम18 मोशन पिक्चर्सचे ध्येय आहे प्रेक्षकांना सर्व भाषांमधील सर्वोत्कृष्ट विषय असणारे चित्रपट देण्याचे. आमचा ठाम विश्वास आहे की, प्रांतीय सिनेमा मार्केटमध्ये भरपूर प्रचुर विषय आहेत आणि आमचा हेतू फक्त ते शोधून काढण्याचा आहे. मराठी सिनेमा विश्वातील “आपला मानूस”च्या अभूतपूर्व यशानंतर, आमचा नवीन मराठी सिनेमा “सायकल” सादर करण्यात मला खूपच अभिमान वाटत आहे. हा सिनेमा आमच्या प्रेक्षकांची नक्कीच विशेष पसंती मिळवेल त्याचबरोबर उत्तम प्रतिसाद मिळवेल असे मला वाटते आहे.”

वायकॉम18 मोशन पिक्चर्स मराठी आणि कलर्स मराठीचे बिझनेस हेड, निखील साने म्हणाले, “मागील काही वर्षांपासून मराठी सिनेमामध्ये अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्मात्यांची नवीन पिढी नाविन्यपूर्ण  कल्पना आणि ताज्या विषयांसह दिसून येत आहे. असेच एक दिग्दर्शक प्रकाश कुंटें यांच्यासोबत या सिनेमात सहयोग करताना मला अतिशय आनंद झाला. सायकल हा पूर्णपणे कोकणात चित्रीत केलेला सिनेमा त्यामुळे चित्रपट बघताना प्रेक्षकांच्या बालपणाच्या आणि सुट्टीच्या निसर्गरम्य आठवणी जाग्या होतील यात शंका नाही. मला खात्री आहे की, सर्वजण मुलांसह त्यांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत या सिनेमाचा आनंद घेतील.”

निर्माते संग्राम सुर्वे म्हणाले, “आम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी खूप प्रमाने सायकल हा सिनेमा बनवला आहे. आम्ही कथा ऐकल्यानंतर एका मिनिटात हा सिनेमा बनविण्याचा निर्णय घेतला. वायकॉम18 मोशन पिक्चर्सने देखील याला संमंती दर्शवली त्यामुळे आमचा आनंद द्विगुणीत झाला, कारण  त्यांनीसुध्दा सिनेमा पाहिल्यानंतर एका मिनिटात करार करण्याचा निर्णय घेतला. “चांगुलपणाचा” संदेश देणारी आमची ही कथा प्रेक्षकांना मोहित करेल असा आम्हाला विश्वास आहे.”

निर्माते अमर पंडित म्हणाले, “अतिशय कमी सिनेमे असे असतात की जे तुमच्या मनाला भिडतात आणि तुमच्या हृद्यात विशेष स्थान निर्माण करतात. सायकल हा तसाच एक चित्रपट आहे. सायकल सारखा सिनेमा मी परत बनवू शकेन असे मला वाटत नाही. मुलांसह सर्वांनी सायकल हा सिनेमा त्यातील चांगुलपणासाठी अनुभवायला नक्कीच पाहिलाच पाहिजे, कारणतो गंमतीदार पद्धतीने आणि मनोरंजकतेने प्रेक्षकांच्या समोर मांडण्यात आला आहे. 12 वर्षांच्या मुलापासून ते 70 वर्षांच्या वृद्धापर्यंत प्रत्येकाला आमच्या सायकलची जादु नक्कीच आवडेल....”

दिग्दर्शक प्रकाश कुंटे म्हणाले, “सायकल ही एक भावनाशील आणि मनोवेधक कथा आहे जी विविध भावनांना स्पर्श करते आणि एका खास प्रकारे प्रेक्षकांपर्यंत पोहचते. हा सिनेमा तुम्हाला जाणवून देतो की अगदी छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा आनंद लपलेला असतो आणि तो साजरा करणे महत्वाचे असते. हॅपी माइंडस एंटरटेनमेंट आणि वायकॉम18 मोशन पिक्चर्स सोबत या सिनेमासाठी काम करण्यात मला खूप आनंद मिळाला आहे.”  

सायकल सिनेमा तुम्हाला भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील कोकणातील एका छोट्या गावात घेऊन जातो. या सिनेमात सायकल वर अतिशय प्रेम असलेल्या प्रमुख पात्राचे केशवचे हृद्यस्पर्शी चित्रण आहे. केशवच्या गावात आलेल्या दोन अज्ञात व्यक्ती ही सायकल चोरतात. केशवला त्याची सायकल परत मिळते का? चोरांनी सायकल का चोरली आहे? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला सायकल हा सिनेमा नक्की बघा.

 


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :