अमृताने स्वीकारले आव्हान

अमृता सुभाषने तिच्या अभिनयाने मराठीतच नव्हे तर बॉलिवुडमध्येही आपले स्थान निर्माण केले आहे. ती फुलराणी या नाटकामुळे नावारूपाला आलेल्या अमृताने आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत.

अमृताने स्वीकारले आव्हान
Published: 10 Sep 2016 01:32 PM  Updated: 10 Sep 2016 01:42 PM

अमृता सुभाषने तिच्या अभिनयाने मराठीतच नव्हे तर बॉलिवुडमध्येही आपले स्थान निर्माण केले आहे. ती फुलराणी या नाटकामुळे नावारूपाला आलेल्या अमृताने आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. आता मैं अॅल्बर्ट अॅनस्टान बनना चाहता हूँ या तिच्या आगामी चित्रपटात ती एका मूकबधीर स्त्रीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाविषयी अमृता सांगते, "आपल्या शिक्षणपद्धतीवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटात मी एका मूकबधीर स्त्रीची भूमिका साकारत आहे. या स्त्रीला शिक्षणाचे महत्त्व चांगलेच माहीत आहे. त्यामुळे आपल्या मुलाला शिक्षण घेण्यासाठी ती नेहमी प्रोत्साहन देते. तसेच नेहमीच त्याच्या पाठीशी उभी राहाते. मूक बधीर स्त्रीची भूमिका साकारणे सोपे नाहीये. मी अभिनय करताना माझ्या भावना डोळ्यांच्या मदतीने व्यक्त केल्या आहेत. या भूमिकेसाठी मला खूपच मेहनत घ्यावी लागली. माझ्यासाठी हे एक आव्हानच होते. पण हे आव्हान मी चांगल्यारितीने पेलले आहे असे मला वाटते." 


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :