​अमिता खोपकर झळकणार हिंदी मालिकेत

​अमिता खोपकर शशी सुमित प्रोडक्शनच्या एका हिंदी मालिकेत काम करणार असल्याचे म्हटले जात आहे. या मालिकेत करण वीर मेहरा, श्रुती सेठ यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत.

​अमिता खोपकर झळकणार हिंदी मालिकेत
Published: 28 Apr 2017 12:54 PM  Updated: 28 Apr 2017 12:54 PM

अमिता खोपकर यांनी अनेक मराठी मालिका, चित्रपटात, नाटकांमध्ये काम केले आहे. मराठीत अनेक वर्षं त्या काम करत असल्या तरी त्या कधीही हिंदी मालिकेकडे वळल्या नव्हत्या. पण त्या नुकत्याच ससुराल सिमर का या मालिकेत झळकल्या. ही त्यांची पहिलीच हिंदी मालिका असून त्यांना या मालिकेत काम करायला खूप मजा आली होती. हिंदी इंडस्ट्रीत त्या कोणालाच ओळखत नव्हत्या. पण एका कास्टिंग डायरेक्टरकडून त्यांना रश्मी प्रोडक्शनच्या कार्यक्रमाच्या ऑडिशनविषयी कळले. त्यांचे ऑडिशन प्रोडक्शन टीमला प्रचंड आवडले होते. पण काही कारणास्तव ही मालिका बनूच शकली नाही. याच प्रोडक्शन हाऊसकडून त्यांना काही महिन्यांनंतर पुन्हा ऑडिशनसाठी फोन आहे आणि त्या ससुराल सिमर का या मालिकेच्या भाग बनल्या. या मालिकेतील त्यांची ज्वाला देवी ही भूमिका चांगलीच गाजली होती. आणि आता त्या पुन्हा एकदा हिंदी मालिकेमध्ये झळकणार आहेत. 
शशी सुमीत प्रोडक्शनची एक मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ही एक कॉमेडी मालिका असून या मालिकेत करण वीर मेहरा, श्रुती सेठ यांच्या प्रमुख भूमिका असणार असल्याचे म्हटले जात आहे. श्रुती सेठ शरारत या मालिकेमुळे नावारूपाला आली. त्यानंतर ती अनेक मालिकांमध्ये झळकली. गेल्या दोन वर्षांपूर्वी तिने बाल वीर या मालिकेत काम केले होते. दरम्यानच्या काळात ती द ग्रेट इंडियन फॅमिली ड्रामा, कॉमेडी नाइट्स बचाओ यांसारख्या रिअॅलिटी शोमध्ये झळकली होती. आता या कॉमेडी मालिकेद्वारे ती पुन्हा एकदा मालिकेत दिसणार आहे. 
या मालिकेत श्रुती आणि करणसोबतच तन्वी ठक्कर, खुशबू ठक्कर, अशोक लोखंडे आणि अमिता खोपकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 

हाफ गर्लफ्रेंड हिंदी मीडियमवर भारी पडेल असे तुम्हाला वाटते का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :