SHOCKING : ...म्हणून पती देतो पत्नीला धोका !

जर सेक्स लाइफमध्ये काही अडचणी आल्या तर याचा सर्वात मोठा परिणाम पुरुषांवर होत असतो ज्यामुळे ते दुसऱ्या महिलांच्याबाबतीत विचार करु लागतात.

SHOCKING : ...म्हणून पती देतो पत्नीला धोका !
Published: 18 Mar 2017 05:08 PM  Updated: 18 Mar 2017 05:16 PM

-Ravindra More
आजच्या काळात विदेशातच नव्हे तर भारतातही घटस्पोटाचे प्रमाण वाढत आहेत. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पतीकडून पत्नीचा होणारा विश्वासघात होय. महिला पतीकडून होणारा विश्वासघात सहन करु शकत नाही आणि हिच बाब नाते तुटायला कारणीभूत ठरते. जर आपल्याला आपले नाते टिकवून ठेवायचे असेल तर पती का धोका देतोय याचे कारण नक्की समजून घ्या. तर चला मग जाणून घेऊया की, कोणत्या कारणांनी आपल्याला पतीकडून धोका मिळतो. 

* बऱ्याचदा पुरुष एकाच नात्यात राहून बोअर होतात. काही महिला घरच्या जबाबदाऱ्यामध्ये एवढ्या व्यस्त होऊन जातात की, त्या पतींकडे लक्ष देऊ शकत नाही. या कारणाने पुरुष आपल्या आयुष्यात काही नवे शोधण्याचा प्रयत्न करतात. यासाठीच सध्या ‘एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर’च्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. 

* जर एखाद्या कारणाने पती-पत्नीमध्ये भांडण झाले तर अशावेळी अहंकाराच्या कारणाने पत्नीला पती धोका देत असतो. तो तिला दाखवून देत असतो की, किती फटक्यात तो मुलींना आपल्याकडे सहज आकर्षित करु शकतो. 

* एका संशोधनानुसार, ८० टक्के पुरुष सेक्शुअल ईच्छांमुळे पत्नीला धोका देत असतात असे स्पष्ट झाले आहे. जर सेक्स लाइफमध्ये काही अडचणी आल्या तर याचा सर्वात मोठा परिणाम पुरुषांवर पडत असतो ज्यामुळे ते दुसऱ्या महिलांच्याबाबतीत विचार करु लागतात. 

 * बऱ्याच महिला आपल्या सवयीने मजबूर असतात आणि त्या वारंवार आपल्या पतीला टोमणे मारत असतात. अशाने पती तिच्याशी बऱ्याच गोष्टी शेअर करणे टाळू लागतो आणि दुसऱ्या महिलेकडे आकर्षित होतो. 

* जेव्हा पुरुष एखाद्या बिजनेस ट्रिपला जातो तेव्हा बऱ्याचदा त्याला दुसरी महिला आवडू लागते. पत्नी जवळ नसल्याकारणाने तो तिला फ्लर्ट करण्यासदेखील घाबरत नाही. 

- वरील संशोधन अमेरिकी युनिव्हर्सिटी मिनिसोटाच्या समाजवैज्ञानिकांनी केले आहे आणि वेगवेगळ्या समाजात याचे वेगवेगळे महत्त्व होऊ शकते. 


कंगना राणौतचा सिमरन हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :