गायक पीटर आंद्रेची व्यायाम करतानाची ही अजब सवय तुम्हाला माहीत आहे काय?

​फिटनेसचे महत्त्व काय असते, हे एखाद्या सेलिब्रिटीशिवाय दुसरे कोण सांगू शकणार? त्यामुळेच सेलिब्रिटी तासन्तास जीममध्ये घाम गाळताना बघावयास मिळतात.

गायक पीटर आंद्रेची व्यायाम करतानाची ही अजब सवय तुम्हाला माहीत आहे काय?
Published: 01 Mar 2017 08:14 PM  Updated: 01 Mar 2017 08:14 PM

फिटनेसचे महत्त्व काय असते, हे एखाद्या सेलिब्रिटीशिवाय दुसरे कोण सांगू शकणार? त्यामुळेच सेलिब्रिटी तासन्तास जीममध्ये घाम गाळताना बघावयास मिळतात. यासाठी खास ट्रेनरकडून त्यांना धडे दिले जातात; मात्र गायक पीटर आंद्रे याची जीम मारण्याची सवय जर तुम्ही ऐकली तर तुम्ही अवाक् व्हाल! कारण त्याला चक्क न्यूड होऊन जीम मारणे पसंत असल्याचा खुलासा त्याने केला आहे. 



फिमेलफर्स्ट डॉट को डॉट यूके या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, ४४ वर्षीय पीटरने गेल्या महिन्यात त्याचा एक अर्धनग्न फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. त्याच्या या फोटोमुळे सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली होती. याला उत्तर देताना पीटरने म्हटले होते की, जीम मारताना तो सहसा पारंपरिक कपडे परिधान करतो; मात्र कधी-कधी त्याला न्यूड होऊन जीम करायला आवडते. 

पीटरने ‘न्यू’ साप्ताहिकाशी बोलताना सांगितले की, मी जीममध्ये व्यायाम करतानाचा एक फोटो शेअर केला होता. त्यामुळेच माझ्या या आगळ्यावेगळ्या सवयीची लोकांना माहिती झाली. लोक यावर सातत्याने चर्चा करू लागल्याचे मला समजल्यानंतर मी यावर जाहीरपणे खुलासा करणे योग्य समजले. मला खरोखरच जीममध्ये विनाकपड्यांची कसरत करायला आवडते. 



जीममध्ये येण्याअगोदर मेकअप करण्याविषयी जेव्हा पीटरला विचारण्यात आले होते तेव्हा पीटरने सांगितले की, एका ठरावीक मर्यादेपर्यंत मला मेकअप करायला आवडतो. कारण मी फिटनेसविषयीचा अधिक विचार करतो. कधी-कधी तर न्यूड होऊन जीम करण्यात मला अधिक आनंद मिळतो. आता पीटर आंद्रेची ही अजब सवय लोकांना माहीत झाल्यानंतर त्याच्याविषयी येत्या काळात आणखी काय प्रतिक्रिया उमटतील हे बघणे मजेशीर ठरेल. 


दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया नच बलियेचे विजेते ठरतील का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :