‘तीन’ : बच्चनचा प्रभाव तरिही अभाव

‘तीन’ : बच्चनचा प्रभाव तरिही अभाव विषयी आणखी काही

cnx masti rating
Readers rating
Readers review
(0)

Editors review

‘तीन’ : बच्चनचा प्रभाव तरिही अभाव


‘तीन’ हा चित्रपट म्हणजे ‘मॉन्टेज’ या कोरियन चित्रपटाचा रिमेक आहे. इमोशनल थ्रीलर असलेला हा चित्रपट म्हणजे न्यायासाठी झगडणाºया एका आजोबाची कहानी आहे. जॉन बिस्वास(अमिताभ बच्चन) यांच्यापासून या कथेची सुरुवात होते. जॉन नेहमीप्रमाणे नातीचे अपहरण करणाºया अपरहणकर्त्यांबद्दल माहिती घेण्यास पोलिस ठाण्यात पोहोचतो. आठ वर्षांपूर्वी जॉनच्या नातीचे अपहरण झालेले असते आणि अपहरणादरम्यान अपघातात तिचा मृत्यू झालेला असतो. या प्रकरणाचा तपास इन्सपेक्टर मार्टिन(नवाजुद्दीन सिद्दीकी)याच्याकडे असतो. लाख प्रयत्न करूनही मार्टिन अपहरणकर्त्यांना पकडू शकत नाही. आपल्यामुळेच जॉनच्या नातीचा बळी गेला, असे मार्टिनला वाटू लागते.  सिनिअर आॅफिसरही मार्टिनला अपयशी ठरला म्हणून त्याला खरी खोटी सुनावतात. यानंतर मार्टिन पोलिसांची नोकरी सोडून चर्चमध्ये प्रीस्ट फादर  बनतो. त्याच्यानंतर सरिता(विद्या बालन) या महिला पोलिस अधिकाºयाकडे या प्रकरणाचा तपास सोपवला जातो. जॉनच्या मदतीने सरिता या प्रकरणाचा छडा लावण्यात गुंतून जाते.

अ‍ॅक्टिंग : हा संपूर्ण सिनेमा तीन चार पात्रांभोवती फिरतो. चित्रपटाची सुरुवात काहीसी संथ वाटते. पण मध्यंतरानंतर चित्रपट गती घेतो. पण तरिही चित्रपट काहीच पात्राच्या भोती फिरत राहतो.नातीच्या अपहरणकर्त्यांना शिक्षा देण्यासाठी भटकणारा, आपल्याच विचारांत मग्न असलेला, उदास आजोबा अमिताभ यांनी साकारला आहे. अमिताभ यांची देहबोली आणि संवादातून निराशा झळकते आणि ही निराशा, त्यांचे दु:ख खरे वाटते. एकंदर एक हतबल आजोबा अमिताभ यांनी अतिशय सक्षमपणे रंगवलाय. ‘तीन’ पहाण्यासारखा चित्रपट आहे वा नाही, हे सांगणे कठीण ठरेल. अभियन सक्षम आहे. कथाही चित्ताकर्षक आहे. पण चित्रपटाची लांबलेली पटकथा या चित्रपटाची मोठी बाधा आहे. क्लायमेक्स विनाकारण लांबवला आहे. संदिग्ध व्यक्तिरेखा ही चित्रपटाची आणखी एक बाधा आहे. नवाजुद्दीनने एक संघर्षरत माजी पोलिस अधिकारी बºयापैकी साकारला आहे. मात्र तो ती भूमिका पूर्णपणे जिवंत करू शकला नाही, हे जाणवल्याशिवाय राहत नाही. बºयाचदा तो काहीसा गरिब बिच्चारा वाटतो. विद्या बालनची व्यक्तिरेखाही फारसा प्रभाव पाडत नाही. एक पंगू व्यक्तिरेखा साकारण्यात विद्याने आपला वेळ वाया घालवला, असेच वाटते. पोलिस अधिकाºयाच्या भूमिकेत विद्या अगदीच नवशिकी वाटते. चित्रपटातील अनेक टिष्ट्वस्ट  गोंधळून टाकतात तर काही प्लॉट क्लिष्टपणा वाढवतात. काही भावनिक प्रसंग आणि कोलकात्यातील उत्तम लोकेशन एवढेच काय ते या चित्रपटाची जमेची बाजू आहे. एकंदर सांगायचे तर तुम्ही अमिताभचे चाहते असाल तर हा चित्रपट चित्रपटगृहात जावून पाहू शकता. अन्यथा टीव्ही येण्याची प्रतीक्षा केलेलीच बरी!

रेटिंग : 2 1/2

- जान्हवी सामंत

Write A Review

Rate the movie

Readers Review

  • Be the first person to review this movie!

मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :