Sonu Ke Titu Ki Sweety Movie Review: मनोरंजक कथा! विषयी आणखी काही

  • भाषा - हिंदी कलाकार - रोमॅन्टिक कॉमेडी २ तास २० मिनिट 2 घंटा 20 मिनट
  • निर्माता - लव रंजन, भूषण कुमार, कृष्णा कुमार, अंकुर गार्ग दिग्दर्शक - लव रंजन
  • Duration - २ तास २० मिनिट Genre - रोमॅन्टिक कॉमेडी
cnx masti rating
Readers rating
Readers review
(0)

Editors review

Sonu Ke Titu Ki Sweety Movie Review: मनोरंजक कथा!

- जान्हवी सामंत

‘सोनू के टीटू की स्वीटी’ हे इतके कठीण नाव देण्यापेक्षा या चित्रपटाला ‘प्यार का पंचनामा3’ असे सुटसुटीत नाव दिले असते तरी चालले असते. पटकथा लेखक व दिग्दर्शक लव रंजन याच्या ‘प्यार का पंचनामा’ स्टाईलचेच नवे व्हर्जन म्हणजे ‘सोनू के टीटू की स्वीटी’,असे या चित्रपटाचे वर्णन केले तरी चालेल. एका तरूणाच्या दृष्टिकोणातून मुलींचा स्वभाव आणि त्यांची वागणूक यावर लिहिलेला कॉमेडी ड्रामा असे या चित्रपटाबद्दल म्हणता येईल.
सोनू (कार्तिक आर्यन)आणि टीटू (सनी सिंह)हे दोघेही बालपणीचे मित्र. सोनूची आई लहानपणीच त्याला सोडून जाते. त्यामुळे मातृछत्र हवलेल्या सोनूला टीटूचे कुटुंब आपल्या कुटुंबात सामावून घेते. टीटूचा भाऊ म्हणून सोनू वाढू लागतो. साहजिकच सोनू आणि टीटू दोघेही एकमेकांबद्दल कमालीचे हळवे असतात. टीटू काहीसा भोळा असल्यामुळे त्याला मुलींच्या कचाट्यातून सोडवण्याची जबाबदारी सोनूची असते. पुढे गर्लफ्रेन्ड पियूशी टीटूचे ब्रेकअप होते आणि या ब्रेकअपनंतर एक चांगली मुलगी शोधून तिच्यासोबत संसार थाटण्याचा निर्णय टीटू घेतो. पण टीटूने इतक्या घाईघाईत इतका मोठा निर्णय घेणे, सोनूला मान्य नसते. याचदरम्यान टीटूला स्वीटी(पुसरत भरूचा) आवडते. पण सोनू मात्र स्वीटीत दोष काढण्याची एकही संधी सोडत नाही. अर्थात तरीही  टीटूच्या सगळ्या कुटुंबीयांची मने जिंकण्यात स्वीटी यशस्वी होते. पण सोनूचे संशयी डोके मात्र त्याला स्वस्थ बसू देत नाही. पुढे टीटू व स्वीटीचा साखरपुडा होतो आणि साखरपुडा होताच स्वीटी सोनूला आपले खरे रंग दाखवणे सुरु करते. एकापेक्षा एक विनोदी युक्त्या क्लृत्या वापरून सोनू स्वीटीचे खरे रूप कुटुंबाला दाखवू पाहतो. पण स्वीटी अगदी प्रत्येकवेळी सफाईने यातून निसटते. सोनू आणि स्वीटीची वरवरची मैत्री आणि आतून सुरू असलेले वैर पुढे वाढतच जाते. याचदरम्यान टीटूचे मॉडर्न दादू (आलोक नाथ) सोनूला येऊन मिळतात. पण स्वीटी हार मानणा-यापैकी नसतेच. सोनू आपल्या मित्राला चतूर स्वीटीच्या तावडीतून वाचवतो की टीटू लग्नाला बळी ठरतो, ही या चित्रपटाची कथा आहे.
या चित्रपटाचे खरे श्रेय लेखक लव रंजन आणि राहुल मोडी यांना द्यायला हवे. कलाकारांची निवडही कथानकाला साजेशी केल्यामुळे प्रत्येक भूमिका पडद्यावर खुलून दिसते. परिणामी, शेवटच्या पंधरा मिनिटांपर्यंत हा चित्रपट तुम्हाला खिळवून ठेवतो. मेलोड्रामा आणि कॉमेडी याची अगदी योग्य मात्रा असेच हा चित्रपट पाहताना जाणवते.
अभिनयाच्या बाबतीत अलोकनाथ यांना तोड नाही. नेहमीच्या ‘संस्कारीबाबू’पेक्षा एक वेगळे आणि हटके पात्र त्यांनी साकारले आहे. खूप काही करता येण्यासारखे नसल्याने कातिर्क आर्यनच्या अभिनयात अख्ख्या चित्रपटात तोच तोपणा जाणवतो.   नुसरत भरूचाने मात्र या चित्रपटात स्वत:तील १०० टक्के दिले आहे. चित्रपट ब-याचअंशी महिलांच्या दुर्गुणांवर बोलतो. म्हणजे, चित्रपटात कायम महिला स्वार्थी असतात, चतूर असतात, कुरघोडी करणाºया असतात, असाच सूर ऐकू येतो. हे इतके टाळले म्हणजेच डोके बाजूला ठेवून बघितला तर हा चित्रपट मस्तपैकी मनोरंजन करतो, यात मात्र शंका नाही. त्यामुळे हलके फुलके विनोदी चित्रपट आवडणा-यांनी हा चित्रपट जरूर बघावा.

RELATED VIDEOS

Write A Review

Rate the movie

Readers Review

  • Be the first person to review this movie!

मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :