कोणाला डेट करतेय प्रियांका चोप्रा ?

प्रियांका नुकतीच अमेरिकतला टॉक शो जिमी किमेलच्या शो मध्ये आली होती. यावेळी प्रियांकाने अनेक गुपितं सांगितली.

कोणाला डेट करतेय प्रियांका चोप्रा ?
Published: 11 May 2017 04:01 PM  Updated: 11 May 2017 04:01 PM

मेट गाला 2017मुळे आपल्या ड्रेसमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा पुन्हा एकदा बेवॉचच्या प्रमोशनमध्ये व्यस्त झाली आहे. प्रियांका चोप्रा अमेरिकेचा टॉक शो जिमी किमेल लाइवच्या शोमध्ये आली होती. प्रियांका तिसऱ्यांदा या शोमध्ये गेस्ट म्हणून आली होती.   
या शोचा होस्ट जिमी किमेलने प्रियांका वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले आणि प्रियांकाने या प्रश्नांची उत्तर देताना अनेक गुपितं उघडली केली. मेट गाला 2017मध्ये प्रियांका गायक-गीतकार निक जोनसेसोबत दिसली होती. यावरुन जिमी ने तिला तू जोनसेला डेट करते आहेस का असा प्रश्न विचारला. तुझ्या आणि निकमध्ये नेमके काय चालंय ? यावर प्रियांकाने उत्तर दिले आम्ही दोघे राल्फ लॉरेन या एकाच डिझायनरचे कपडे घालून जाणार होतो म्हणून आम्ही याठिकाणी एकत्र जाण्याचा निर्णय घेतला. निक हा प्रियांका पेक्षा वयाने लहान आहे. मेट गाला 2017 मध्ये प्रियांकाचा ड्रेस पाहुन खुद्द निक जोनसही काही वेळासाठी दचकला होता. प्रियांकाच्या या घेरदार ड्रेसवर पाय पडू नये, म्हणून तो पूर्णवेळ काळजी घेताना दिसला होता. 
प्रियांचाका बेवॉच हा चित्रपट 26 मे ला प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी ती मुंबईतही येऊन गेली. यावेळी तिला बेवॉच टीमाला तू मुंबईत घेऊन येऊन चित्रपटाचे प्रमोशन करणार का असा प्रश्न विचारण्यात आला होता त्यावर ती नाही म्हणाली होती. बेवॉच प्रमोशन करण्यासाठी आता खूप दिवस आमच्या हातात उरले नाहीत त्यामुळे बेवॉचची टीम मुंबईत येऊन चित्रपटाचे प्रमोशन करणार नसल्याचे तिने म्हटले होते.  


दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया नच बलियेचे विजेते ठरतील का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :