Say what? ​‘वीरे दी वेडिंग’साठी करिना कपूरने दिला होता नकार !!

‘वीरे दी वेडिंग’ ही चार मैत्रिणींची कथा आहे. खुद्द करिना कपूरने या चित्रपटाचा प्लॉट लिक केला आहे. आता ही कथा लिक झाल्यावर या भूमिकेसाठी करिना कपूरपेक्षा दुसºया कुठल्या हिरोईनची आपण कल्पनाही करू शकत नाही. पण खुद्द करिनाचे मत म्हणाल तर, ती या चित्रपटासाठी स्वत:ला फिट मानत नव्हती.

Say what? ​‘वीरे दी वेडिंग’साठी करिना कपूरने दिला होता नकार !!
Published: 12 Jul 2017 10:55 AM  Updated: 12 Jul 2017 10:55 AM

करिना कपूर ‘वीरे दी वेडिंग’साठी सज्ज झाली आहे. चित्रपटाचे शूटींगही सुरु झाले आहे. ‘वीरे दी वेडिंग’ ही चार मैत्रिणींची कथा आहे. खुद्द करिनाने या चित्रपटाचा प्लॉट लिक केला आहे. होय, एका मुलाखतीत या चित्रपटाबद्दल ती भरभरून बोलली. मित्रांबाबत अतिशय पजेसिव्ह असलेल्या मुलीची भूमिका मी यात साकारते आहे. हा चित्रपट म्हणजे चार मुलींची कथा आहे. माझ्या लग्नाला त्या येतात आणि मग एकापाठोपाठ एक अशा धम्माल गोष्टी घडतात. महिला आणि त्यांच्या भावना या दाखवल्या जाणार आहेत, असे करिनाने सांगितले.
आता ही कथा लिक झाल्यावर या भूमिकेसाठी करिना कपूरपेक्षा दुसºया कुठल्या हिरोईनची आपण कल्पनाही करू शकत नाही. पण खुद्द करिनाचे मत म्हणाल तर, ती या चित्रपटासाठी स्वत:ला  फिट मानत नव्हती. ‘वीरे दी वेडिंग’ची निर्माती रिया कपूर हिला करिनाने तसे स्पष्ट बोलूनही दाखवले होते. करिनाने स्वत: याबाबत माहिती दिली. ती म्हणाली की, रिया हा चित्रपट घेऊन आली तेव्हा मी प्रेग्नंट होते. खरे सांगायचे तर रियाचा प्रस्ताव माझ्यासाठी धक्काचं होता. या चित्रपटातील भूमिकेत मी फार फिट नाहीय, असे मला त्याक्षणी वाटते. मग काय,माझ्यापेक्षा दहा वर्षाने लहान असलेली दुसरी एखादी हिरोईन निवड,असे मी रियाला स्पष्टपणे सांगितले. मी प्रेग्नंट आहे, याची कल्पनाही तिला दिली. पण रिया मानली नाही. ही महिलांची कथा आहे आणि तुझ्याशिवाय मी कुणालाही घेणार नाही, असे सांगून तिने मला नि:शब्द केले.

ALSO READ : करिना कपूरच्या लाडक्या तैमूरची पुन्हा बघावयास मिळाली झलक!

एकंदर काय तर, आपल्यामुळे रियाच्या चित्रपटाचा खोळंबा होता कामा नये, असे बेबोला वाटत होते. पण रियापुढे तिचा नाईलाज झाला. पण यासाठी रियाला मनापासून आभार द्यायला हवेत. कारण करिना इतकी सक्षम अभिनेत्री ‘वीरे दी वेडिंग’साठी दुसरी कुठलीच नव्हती. रियाची निवड अगदी शंभर टक्के योग्य होती, आहे. अर्थात हे झाले आमचे मत. तुम्हाला काय वाटते, ते कळवाच.


पुन्हा फुलणार का सलमान खान आणि कतरिना कैफची लव्हस्टोरी?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :