कॉन्ट्रोव्हर्सीचा चित्रपटाला फायदाच होतो - सलमान खान

सुलतान या चित्रपटासाठी सलमान चांगलाच उत्सुक आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मुलाखत देताना तो खूपच चांगल्या मुडमध्ये होता. मुलाखतीसाठी आल्यावर तो त्याच्याच जीत या चित्रपटातील अभी साँस लेने की फुरसत नही है, तुम मेरी बाहो में हो... हे गाणे गुणगुणतच आला. कॉफीचा घोट घेत घेत त्याने या मुलाखतीला सुरुवात केली. या चित्रपटाविषयी आणि त्याच्या कारकिर्दीविषयी त्याने भरभरून सीएनएक्ससोबत गप्पा मारल्या.

कॉन्ट्रोव्हर्सीचा चित्रपटाला फायदाच होतो -  सलमान खान
Published: 05 Jul 2016 12:07 PM  Updated: 05 Jul 2016 12:07 PM

सुलतान या चित्रपटासाठी सलमान खान चांगलाच उत्सुक आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मुलाखत देताना तो खूपच चांगल्या मुडमध्ये होता. मुलाखतीसाठी आल्यावर तो त्याच्याच जीत या चित्रपटातील अभी साँस लेने की फुरसत नही है, तुम मेरी बाहो में हो... हे गाणे गुणगुणतच आला. कॉफीचा घोट घेत घेत त्याने या मुलाखतीला सुरुवात केली. या चित्रपटाविषयी आणि त्याच्या कारकिर्दीविषयी त्याने भरभरून सीएनएक्ससोबत गप्पा मारल्या.
 
सुलतान या चित्रपटात तू खूप वेगळ्या भूमिकेत झळकणार आहेस, पहिल्यांदाच तू एका कुस्तीपट्टूची भूमिका साकारत आहेस, या चित्रपटाआधी तुला त्यांच्याविषयी काही माहिती होती का?
माझ्या वडिलांकडून मी गामा या पेहलवानाविषयी लहानपणापासून ऐकले होते. दारासिंग यांच्या कुस्तीचे किस्से मी त्यांच्याकडून ऐकले आहेत. तसेच लहान असताना मी माझ्या वडिलांसोबत कुस्ती पाहायला जात असे. आमच्या इंदोरमध्ये तर माझे काका संध्याकाळच्या वेळात कुस्तीचा सरावही करत असत. त्यामुळे कुस्ती हा खेळ माझ्या खूप जवळचा आहे. 
या चित्रपटासाठी तुला किती ट्रेनिंग घ्यावी लागली?
या चित्रपटात मी मातीतील कुस्ती, मॅटवरील कुस्ती असे कुस्तीचे वेगवेगळे प्रकारे खेळलेलो आहे, त्यामुळे या प्रत्येक गोष्टीसाठी मला वेगवेगळी ट्रेनिंग घ्यावी लागली. काही कुस्तीपट्टू मला शिकवण्यासाठी खास सेटवर येत असत. तसेच मला डाएटही खूप करावे लागते. चित्रपटात मी वेगवेगळ्या आकारमानात दिसणार आहे. याचं चित्रीकरण करताना दिग्दर्शन अलीचे म्हणणे होते की, आपण सगळे चित्रीकरण दोन-तीन महिन्यात करून घेऊया. त्यामुळे मी त्याला मस्करीत म्हणतदेखील असे की, तू तर कधी जिममध्ये गेला नाहीस, वजन वाढवणे आणि ते कमी करणे हे हलवा आहे का असे तुला वाटते का? दिवसभराचे चित्रीकरण झाल्यावर मी येवढा थकलेला असायचो की, कधी झोपतो असे मला होत असे. 
आज सुपरस्टार ही पदवी मिळाल्यानंतर इतकी मेहनत घेणे गरजेचे आहे असे तुला वाटते का?
माझ्या तरुणपणात मी इतकी मेहनत घेतली नसती तरी चालली असती. पण आज मी प्रत्येक भूमिकेत स्वतःला ओतून देणे गरजेचे आहे. कारण याच वयात अनेक अभिनेत्यांची कारकिर्द संपताना मी पाहिलेली आहे. काही वर्षांपूर्वी एका चित्रपटातील माझा लूक पाहून माझे वय आता दिसायला लागले होते याची मला जाणीव झाली आणि त्यामुळे मी माझ्या शरीरावर, लूकवर अधिक मेहनत घ्यायला लागलो. मी मेहनत घेतली नाही तर माझी कारकिर्द लवकरच संपेल हे मला चांगलेच माहीत आहे. 
सलमानचे चित्रपट म्हटले की ते 100 करोडहून अधिक व्यवसाय करणारच असे म्हटले जाते, याविषयी तुला काय वाटते?
माझ्याच नव्हे तर सगळ्यांच्याच चित्रपटाने खूप चांगला व्यवसाय करावा असे मला वाटते. आपल्याकडे चित्रपटगृहांची संख्या कमी आहे, ती वाढल्यास तिकिटाचे दर तर कमी होतील, त्याशिवाय पहिल्याच दिवशी 100 कोटींचा आकडा चांगला चित्रपट पार करू शकेल असे मला वाटते आणि या 100 करोडच्या आकड्यात मला विशेष करून सैराट या मराठी चित्रपटाचे कौतुक करायचे आहे. मराठी चित्रपटांचे तिकिट हे हिंदीपेक्षा कमी असूनही त्यांनी इतक्या कमी वेळात 100 कोटी कमावले आहेत. बॉलिवुडने प्रादेशिक चित्रपटांकडून शिकण्याची गरज आहे असे मला वाटते.
या चित्रपटासाठी तू हरयाणी भाषा शिकला आहेस का?
भाषा शिकण्याासाठी जितका वेळ लागतो, तितका माझ्याकडे नाहीये आणि मी आमिरसारखा परफेक्शनिस्टही नाहीये. त्यामुळे मला संवाद प्रोम्पट केले जायचे. माझ्या आईची मातृभाषा मराठी असूनही मला आजही मराठीत चांगले मराठी बोलता येत नाही तर मी हरयाणी कुठून शिकू?
सुलतान या चित्रपटानंतर कुस्तीपट्टूंकडे पाहाण्याचा दृष्टिकोन बदलेल असे तुला वाटते का?
कुस्तीपट्टूंना अतिशय सकस आहार लागतो. अनेकांना तो परवडतदेखील नाही. तसेच त्यांनी व्यायाम योग्यप्रकारे केला नाही तर उतारवायत त्याचा खूप त्रास होतो. त्यामुळे त्यांना योग्य ट्रेनिंग मिळणेही गरजेचे आहे. आपल्याकडे काही खेळ वगळता इतर खेळांना महत्त्व दिले जात नाही. सगळ्या खेळांना योग्य महत्त्व दिले जावे असे मला वाटते. मला ऑल्मपिकचा ब्रँड अम्बेसेडर करण्यात आले त्यावरून अनेकांनी विरोध केला होता. पण माझ्यामुळे एखादा खेळ प्रसिद्ध होत असेल तर त्यात काय चुकीचे आहे आणि त्यातही मी स्पोटर्समॅन नाही असे त्यांनी म्हटले गेले होते. मला सांगायला आवडेल की, मी शालेय जीवनात पोहण्यात अनेक पुरस्कार मिळवले आहेत, असे असताना मी स्पोटर्समॅन नाही हे म्हणणे चुकीचे आहे. 
तू चित्रपट निवडताना कोणत्या गोष्टीला महत्त्व देतोस?
पटकथा ऐकताच क्षणी तर ती मला आवडली तरच मी चित्रपट करतो. अरबाज, सोहेल, अतुल किंवा माझ्या कोणत्याही जवळच्या मित्राने जरी मला चित्रपटाबाबत विचारले तरी पटकथा ऐकल्यावरच मी निर्णय घेतो. पटकथा चांगली नसेल तर त्यांना मी चित्रपटासाठी नकारच देतो. 
तुझ्या अनेक चित्रपटांच्यावेळी कॉन्ट्रोव्हर्सी झाली आहे, याचा चित्रपटावर काही परिणाम होतो असे तुला वाटते का?
कॉन्ट्रोव्हर्सीचा चित्रपटाला फायदाच होतो असे मला वाटते आणि कोणालाही  कॉन्ट्रोव्हर्सीमुळे चित्रपट प्रदर्शित होऊ नये असे वाटत असेल तर त्यांनी पोलिसात जाऊन थेट तक्रार करावी. पण उगाचच चित्रपटगृहासमोर निदर्शने करून इतर लोकांना त्रास देऊ नये असे मला वाटते. 

 
 
मला कोण मिळतच नाही - सलमान खान 
सुलतान या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी सगळ्या वाईट गोष्टी मी सोडल्या होत्या असे सलमान सांगतो. कॉफी आणि सिगारेटमध्ये वाईट असलेली कॉफी मी सोडली असे तो मिश्किलपणे म्हणाला. तर सिगारेट आणि दारूमध्ये सिगारेट सोडली. त्यानंतर दारू आणि स्त्रीमध्ये दारू सोडली. स्त्रीला सोडण्याचा प्रश्नच नाही कारण मला कोण मिळतच नाही असे म्हणत त्याने सिंगल असल्याचे कबूल केले. 


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :