सुपरहिरो टायगर !

अभिनेता टायगर श्रॉफला बच्चेकंपनीसह एन्जॉय करायला आवडतं. त्यांच्यासह तो जास्त रमतो. खुद्द टायगरनं याचा खुलासा केलाय. टायगचा लवकरच 'फ्लाईंग जट' हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येतोय. याच पार्श्वभूमीवर टायगरशी सीएनएक्स लोकमतनं खास संवाद साधला. यावेळी टायगरनं सिनेमा आणि इतर गोष्टीबद्दल भरभरुन गप्पा मारल्या.

सुपरहिरो टायगर !
Published: 17 Aug 2016 04:47 PM  Updated: 17 Aug 2016 04:49 PM

अभिनेता टायगर श्रॉफला बच्चेकंपनीसह एन्जॉय करायला आवडतं. त्यांच्यासह तो जास्त रमतो. खुद्द टायगरनं याचा खुलासा केलाय. टायगचा लवकरच 'फ्लाईंग जट' हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येतोय. याच पार्श्वभूमीवर टायगरशी सीएनएक्स लोकमतनं खास संवाद साधला. यावेळी टायगरनं सिनेमा आणि इतर गोष्टीबद्दल भरभरुन गप्पा मारल्या.
 

आपल्या आगामी सिनेमाचं छोट्या दोस्तांसह प्रमोशन करतोय. तर यामागं काही खास कारण ?
 
लहान मुलं मनाने खूप स्वच्छ असतात. ते कुणालाही जज करत नाहीत, हसतमुख असतात. त्यांच्या मनात काहीही नसतं. त्यामुळं मला लहान मुलांसह वेळ घालवायला, त्यांच्यासह एन्जॉय करायला खूप आवडतं. त्यांच्यामध्ये मी खूप रमतो. आपल्यासमोर कुणी सुपरहिरो आहे की हिरो आहे याची त्यांना पर्वा नसते ते फक्त आनंदी असतात. त्यामुळं लहान मुलांसह माझ्या आगामी 'फ्लाईंग जट' सिनेमाचं प्रमोशन करतोय.
 
'फ्लाईंग जट' हा सिनेमा सुपरहिरोवर आधारित आहे. तर या सिनेमातील तुझ्या भूमिकेविषयी जाणून घ्यायला आवडेल
 
या सिनेमात मी साकारत असलेला मुलगा खूप साधाभोळा आहे. अचानक त्याला चमत्कारीक शक्ती प्राप्त होते. हा सुपरहिरो आजवरील सुपरहिरोपेक्षा वेगळा ठरेल असं मला वाटतं. शक्ती मिळाल्यावर त्याचं काय करावं हे त्या मुलाला कळत नाही. या शक्ती मिळाल्यामुळं त्याच्या आईला मात्र आनंद होतो.
 
सुपरहिरो साकारण्यासाठी कुणाला ना कुणाला नजरेसमोर ठेवलं असशील. स्पायडरमॅनबद्दल तुझ्या काही विशेष भावना आहेत. त्याही जाणून घ्यायला आवडतील.
 
लहानपणापासून मला स्पायडरमॅनसारखं बनायचं होतं. मी जे काही करेन ते स्पायडरमॅनसारखंच करेन असं वाटायचे. कारण सुपरहिरो जरी असला तरी स्पायडरमॅनमध्ये मानवी गुण आहेत. शक्ती असल्या तरी तो कमजोर वाटतो. त्यामुळं मी स्वतःला त्याच्याशी रिलेट करतो. म्हणूनच कधी ना कधी मला स्पायडरमॅन बनायचंय.
 
सुपरहिरो बनण्याचा विचार करणं आणि ती प्रत्यक्ष साकारणं यांत खूप फरक आहे. त्यामुळं ही भूमिका साकारण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागली.
 
बालपणापासूनच सुपरहिरो बनण्याची इच्छा होती. कधी तरी सुपरहिरो बनावं असं वाटायचं. माझा पहिला सिनेमा सुपरहिरोवर आधारित असावं असंही वाटायचं.  ती इच्छा पहिल्या सिनेमात पूर्ण झाली नसली तरी तिस-या सिनेमात प्रत्यक्षात येतेय याचा सर्वाधिक आनंद आहे. त्यामुळं सुपरहिरो बनण्याची तयारी तर मी लहानपणापासूनच करत होतो असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. या सिनेमात एक्शन आहे. उड्या मारणं, उडणं सारं काही आहे. एक्शनसाठी बरीच मेहनत घेतलीय. कारण सुपरहिरो साकारणं, एक्शन करणं माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होतं. ही भूमिका साकारण्यासाठी मी माझ्यासमोर जॅकी चॅनचा आदर्श ठेवला. कारण एक्शन करता करता कॉमेडीही तितक्याच सहजतेने तो करतो. हा सिनेमाही त्याच प्रकारातील म्हणजे एक्शन-कॉमेडी आहे. यांत मार्शल आर्टचाही वापर आहे. 'बागी'सारखंच मार्शल तुम्हाला भासेल मात्र सुपरहिरो आणि त्याच्या शक्ती यातील वेगळेपण आहे. शिवाय भाषेसाठी पंजाबीचे धडेसुद्धा घेतलेत.
 
सुपरहिरोवर आधारित बरेच सिनेमा आलेत. तर हा सिनेमा बघताना रसिकांना तेच ते बघतोय असं वाटणार नाही का ?
 
नाही वाटणार. कारण शक्ती मिळाल्या तरी यातील नायक हा खूप साधेपणाने राहतो. इतकंच नाही तर त्याच्या आईसाठी कितीही शक्ती आल्या तरी तो तिच्यासाठी एक तिचा साधाभोळा मुलगाच आहे. त्यामुळं हा मुलगा कधी शक्ती वापरत असेल, उडत असेल त्याचवेळी त्याची आई त्याला फोन करते. त्याला बाजारात जायला सांगते. आईच्या सांगण्यावरुन हा सुपरहिरो मग बाजारात जाऊन खरेदी करतो. अशा खूप साध्या साध्या गोष्टी तुम्हाला या सिनेमात पाहायला मिळतील. सुपरहिरो असूनही त्याचा बडेजावपणा तुम्हाला दिसणार नाही.
 
या सिनेमातून एक सामाजिक संदेशही देण्यात आलाय का ?
 
फ्लाईंग जट या सिनेमातून एक सामाजिक संदेश देण्यात आलाय. हा संदेश पर्यावरण संवर्धनाचा आहे. तुमच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ असेल तरच फ्लाईंग जटला शक्ती मिळते. पर्यावरण स्वच्छ ठेवा असा आजच्या काळातील सगळ्यात महत्त्वाचा संदेश हा सिनेमा देतोय याचा आनंद आहे.
   
 
'मुन्ना मायकल' या सिनेमात बहिणीसोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. याबाबत किती एक्साईटेड आहेस ?
 
'मुन्ना मायकल' या सिनेमात कृष्णासुद्धा काम करणार आहे. तिच्यासोबत काम करण्याची संधी मिळतेय हा माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे. कारण शुटिंगसाठी मी बाहेर असताना मी माझ्या कुटुंबाला मिस करतो. यानिमित्ताने ती माझ्यासोबत राहिल. ती माझी एक क्रिटीकसुद्धा आहे. त्यामुळं एकत्र काम करण्याचा अनुभव नक्कीच स्पेशल ठरेल. 
 
 


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :