तनुश्री दत्ताने नाना पाटेकरवर लावला होता छेडछाडीचा आरोप; गुन्हा दाखल!

तनुश्रीने नानावर अशाप्रकारचे आरोप केल्याने तिला इंडस्ट्रीमधून कायमचेच हद्दपार व्हावे लागले. तिने दाखल केलेल्या गुन्ह्याचे पुढे काय झाले हे अजूनही कोणालाच माहिती नाही.

तनुश्री दत्ताने नाना पाटेकरवर लावला होता छेडछाडीचा आरोप; गुन्हा दाखल!
Published: 12 Sep 2017 04:14 PM  Updated: 12 Sep 2017 04:14 PM

‘आशिक बनाया आपने’ या चित्रपटातून चर्चेत आलेली अभिनेत्री तनुश्री दत्ता आज इंडस्ट्रीमधून पूर्णपणे गायब आहे. तनुश्रीने इंडस्ट्रीतून अचानकच अशी एक्झिट का घेतली? असा तिच्या चाहत्यांना प्रश्न पडला असला तरी, एका घटनेनंतरच ती गायब झाल्याचा उलगडा आज आम्ही करणार आहोत. होय, तनुश्रीने अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर छेडछाडीचा आरोप केला होता. त्यानंतरच तिच्या करिअरला उतरती कळा लागली. खरं तर नाना पाटेकर यांची इंडस्ट्रीमध्ये खूपच चांगली इमेज आहे. अशात तनुश्रीने त्यांच्यावर थेट छेडछाडीचा आरोप लावल्याने तिला इंडस्ट्रीपासून दूर जावे लागले. कारण या प्रकरणानंतर तनुश्रीला काम मिळणे बंद झाले. पुढे ती इंडस्ट्रीतून गायबच झाली. 

वास्तविक, हा किस्सा ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटादरम्यानचा आहे. चित्रपटात एक आयटम सॉँग शूट करतानाच्या दरम्यान तनुने नानावर छेडछाडीचा आरोप केला होता. तनुश्रीने म्हटले होते की, आयटम सॉँग शूट करताना नाना पाटेकर यांनी मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. तनुच्या या आरोपांमुळे नानाच्या करिअरवर फारसा परिणाम झाला नाही, परंतु तिला बॉलिवूडचे दरवाजे कायमचेच बंद झाले. खरं तर नाना पाटेकर यांना अ‍ॅग्रेसिव्ह अभिनेता म्हणून ओळखले जाते. को-स्टारसोबत वाद घालण्यावरून त्यांचे नाव बºयाचदा चर्चेत आले आहे. परंतु एखाद्या अभिनेत्रीबरोबर त्यांचा वाद झाला, असे कधीच घडले नव्हते. वास्तविक हा किस्सादेखील शूटिंगदरम्यान घडला होता. त्याचे असे झाले की, ‘हॉर्न ओके प्लीज’मध्ये नाना आणि तनुश्रीमध्ये एक आयटम सॉँग शूट केले जात होते. या सॉँगला गणेश आचार्य कोरिओग्राफ करीत होते. यादरम्यान तनुश्रीने असा आरोप केला की, अचानकच नानाने तिला मिठी मारली आणि डान्स स्टेप्स शिकवायला सुरुवात केली. नानाने अपेक्षेपेक्षा अधिक जवळीकता साधल्याचे लक्षात आल्यानंतर ती घाबरली आणि पळत वॅनिटी व्हॅनमध्ये गेली. 

जेव्हा ही बाब सेटवर उपस्थित असलेल्या तनुच्या आईला समजली तेव्हा त्यांनी एकच गोंधळ घातला होता. त्यांनी घटनेची खातरजमा न करताच काही पत्रकारांना बोलाविले. मात्र नानाने याकडे दुर्लक्ष करीत सेट सोडले. जेव्हा पत्रकारांनी तनुला या घटनेविषयी विचारले तेव्हा तिने काहीही न सांगता, थेट पोलीस ठाणे गाठत नानाच्या विरोधात एफआयआर नोंदविला. यानंतर काय घडले हे कोणालाही कळले नाही. मात्र यामुळे तनुश्रीला इंडस्ट्रीमधून कायमचे गायब व्हावे लागले, हे तेवढेच खरे.


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :