अभिनयानंतर प्रियांका चोप्रा करणार हॉलिवूड चित्रपटाची निर्मिती!

हॉलिवूडमध्ये चित्रपटात आपले नाणं खणखणीत वाजल्यानंतर प्रियांका चोप्रा आता हॉलिवूड चित्रपटाची निर्मिती करणार आहे.

अभिनयानंतर प्रियांका चोप्रा करणार हॉलिवूड चित्रपटाची निर्मिती!
Published: 13 Jul 2017 12:56 PM  Updated: 13 Jul 2017 01:17 PM

बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत प्रसिद्ध असलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा लवकरच हॉलिवूडमध्ये सुद्धा चित्रपटाची निर्मिती करणार आहे. हॉलिवूडमधला पहिला चित्रपट बेवॉचनंतर तिने ‘इजंट इट रोमॅण्टिक’ या दुसऱ्या हॉलिवूडपटाचे शूटिंग सुरु केले आहे. प्रियांका अभिनयासोबतच हॉलिवूडमध्ये चित्रपटच्या निर्मितीवर सध्या लक्ष केंद्रीत करीत आहे. याआधी प्रियांकाच्या प्रोडक्शन हाऊसने अनेक प्रादेशिक चित्रपटांची निर्मिती केली आहे. मराठी, पंजाबी आणि भोजपुरी भाषेत तिने चित्रपट तयार केले आहेत. प्रियांकाचे प्रोडक्शन हाऊस पर्पल पेबल पिक्चर्स व्हेंटिलेटरनंतर 'काय रे रास्कला'  नावाच्या चित्रपटाची निर्मिती करीत आहे. आता प्रियांकाचे प्रोडक्शन हाऊस हॉलिवूडमध्ये चित्रपटाची निर्मिती करण्यास सज्ज आहे. प्रियांकाचे प्रोडक्शन हाऊस तिची आई मधु चोप्रा संभाळतात. व्हेंटिलेटर या त्यांच्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.  

Also Read : लेकीच्या ‘त्या’ ड्रेसवर बोलली प्रियांका चोप्राची आई!  

सूत्रांच्या माहितीनुसार प्रियांकाच्या पहिल्या चित्रपटाचा विषय फायनल करण्यात आला आहे. या वर्षाच्या अखेरीस चित्रपटाची शूटिंग सुरु करण्यात येणार आहे. प्रियांकाची आई मधु चोप्रा यांनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे. प्रियांका सध्या ‘इजंट इट रोमॅण्टिक’च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. ती या चित्रपटात योगा टीचरची भूमिका साकारते आहे. या चित्रपटात तिच्यासोबत रिबेल विल्सन, लिआम हेम्सवर्थ, एडम डिवाइन हे कलाकार आहेत. हा एक रोमॉण्टिक कॉमेडी चित्रपट आहे.  हा चित्रपट न्यूयॉर्क शहरातील वास्तुकार नटाली हिच्या जीवनावर आधारित आहे.     


पुन्हा फुलणार का सलमान खान आणि कतरिना कैफची लव्हस्टोरी?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :