कॅटरिना कैफला वाढदिवसाअगोदरच मिळाला तिसरा केक!

वाढदिवसाच्या अगोदरच कॅटला गिफ्ट आणि शुभेच्छा मिळत असल्याने ती सध्या खूश आहे. आतापर्यंत कॅटला वाढदिवसांचे दोन केक मिळाले आहेत, तर तिसरा केकही नुकताच गिफ्ट केल्याने ती हरकून गेली आहे.

कॅटरिना कैफला वाढदिवसाअगोदरच मिळाला तिसरा केक!
Published: 13 Jul 2017 08:59 PM  Updated: 13 Jul 2017 09:00 PM

अभिनेत्री कॅटरिना कैफ हिच्यासाठी हा आठवडा खूपच स्पेशल असणार आहे. कारण उद्या म्हणजेच शुक्रवारी तिचा ‘जग्गा जासूस’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. या व्यतिरिक्त कॅट १८व्या आयफा अवॉर्डमध्ये (२०१७) जबरदस्त परफॉर्मन्स करणार असून, दुसºया दिवशी ३४वा वाढदिवस सेलिब्रेट करणार आहे. खरं तर वाढदिवसाच्या अगोदरच कॅटला गिफ्ट आणि शुभेच्छा मिळत असल्याने ती सध्या खूश आहे. आतापर्यंत कॅटला वाढदिवसांचे दोन केक मिळाले आहेत, तर तिसरा केकही नुकताच गिफ्ट केल्याने ती हरकून गेली आहे. या केकबरोबर तिने एक फोटो क्लीक करून सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटोमध्ये तिच्या चेहºयावरील आनंद स्पष्टपणे दिसून येत आहे. 

हा फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करताना कॅटरिनाने लिहिले की, ‘डिज्नीकडून वाढदिवसाचा केक! मला वाढदिवस खूपच आवडतो. केक नंबर तीन’ या फोटोमध्ये कॅट पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. केकसोबत तिने एका खास अंदाजात पोज दिली आहे. तिच्या चेहºयावरील आनंद बघण्यासारखा असून, कॅट वाढदिवसासाठी खूपच उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. 
 

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on


कॅटरिना सध्या आयफा २०१७ साठी न्यूयॉर्कला पोहोचली आहे. आयफा सोहळा संपल्यानंतर कॅटरिना तिच्या परिवारातील काही सदस्य आणि आपल्या स्पेशल मित्रांसोबत ३४वा वाढदिवस सेलिब्रेट करणार आहे. काही दिवसांपूर्वीच कॅटच्या जवळच्या मित्रांनी डीएनएला सांगितले होते की, कॅटला तिच्या वाढदिवसासाठी हडसन स्ट्रीट येथील प्रसिद्ध बबीज्चे पेनकेक्स खरेदी करायला खूप आवडते. ती जेव्हा जेव्हा न्यूयॉर्कला जात असते, तेव्हा ती आठवणीने हे केक खरेदी करीत असते. 

खरं तर हॉटेलमध्ये जेवण, म्युझिक आणि नाइट आउटला जाणे कॅटला खूप आवडते. आता तर ती न्यूयॉर्कमध्ये असल्याने ती या संधीचा फायदा अजिबातच सोडणार नाही. एकंदरीतच कॅटचा यावेळेचा बर्थ डे स्पेशल होणार आहे, हे नक्की. असो ‘सीएनएक्स’कडून कॅटला वाढदिवसाच्या अ‍ॅडव्हॉन्स शुभेच्छा! 


कंगना राणौतचा सिमरन हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :