​Valentines Special : आजचा ‘व्हॅलेन्टाईन डे’ बनवा आणखी रोमॅन्टिक ! ऐका बॉलिवूडची पाच रोमॅन्टिक गाणी...!!

आज व्हॅलेन्टाईन डे. आज देशभर वेगवेगळ्या रूपात, वेगवेगळ्या प्रकारे व्हॅलेन्टाईन डे साजरा होईल. भेटवस्तू, रोमॅन्टिक डेट, सरप्राईजेस असे सगळे सगळे होईल. अशात बॉलिवूडच्या रोमॅन्टिक गाण्यांना विसरणे शक्यचं नाही.

​Valentines Special : आजचा ‘व्हॅलेन्टाईन डे’ बनवा आणखी रोमॅन्टिक ! ऐका बॉलिवूडची पाच रोमॅन्टिक गाणी...!!
Published: 14 Feb 2018 10:10 AM  Updated: 14 Feb 2018 10:10 AM

आज व्हॅलेन्टाईन डे. आज देशभर वेगवेगळ्या रूपात, वेगवेगळ्या प्रकारे व्हॅलेन्टाईन डे साजरा होईल. भेटवस्तू, रोमॅन्टिक डेट, सरप्राईजेस असे सगळे सगळे होईल. अशात बॉलिवूडच्या रोमॅन्टिक गाण्यांना विसरणे शक्यचं नाही. प्रेम व्यक्त करण्याची संधी देणारा हा दिवस आणखी रोमॅन्टिक करण्यासाठी आम्ही आपल्यासाठी काही खास रोमॅन्टिक साँग घेऊन आलो आहोत. ही गाणी ऐकल्यानंतर तुमचा आजचा व्हॅलेन्टाईन डे आणखी रोमॅन्टिक झाल्याशिवाय राहणार नाही...मौका मिलेगा तो हम बता देंगे...तुम्हे कितना प्यार करते है सनम... हे ९० च्या दशकातील गाणे म्हणजे, प्रेम व्यक्त करण्यासाठी एकदम परफेक्ट गाणे...‘दिलवाले’ या चित्रपटातील रवीना टंडन आणि अजय देवगण यांच्यावर चित्रीत हे गाणे तुम्हाला आणखीच रोमॅन्टिक करेल, यात शंका नाही.इस तरह आशिकी का असर छोड जाऊंगा...तेरे चेहरे पे अपनी नजर छोड जाऊंगा.... या गाण्याचे शब्द मनाचा ठाव घेणारे आहेत. कुमार सानू यांच्या आवाजातील हे गाणे ऐकून आजही लोकांच्या काळजाचा ठोका चुकतो. ‘इशारों इशारों में’ तुमच्या मनातील भावना व्यक्त करायच्या झाल्यास यापेक्षा दुसरे सुंदर गाणे कुठले बरे असू शकेल.

 

९० च्या दशकातील सुपरहिट चित्रपट ‘आशिकी’मधील ‘धीरे धीरे मेरी जिंदगी में आना...धीरे धीरे से दिल को चुराना...’ हे गाणे या व्हॅलेन्टाईन डेला ऐकायलाच हवे. हे गाणे ऐकल्यानंतर मूड आणखी रोमॅन्टिक झाला नाही तर नवल.‘तुम्हे अपना बनाने की कसम खाई है...’ या गाण्याबद्दल आणखी काही सांगायची गरजच नाही. मूड रोमॅन्टिक असेल तर हे गाणे ऐकणे बनतेच. ‘सडक’ या चित्रपटातील हे गाणे त्या काळातील सर्वाधिक लोकप्रीय गाण्यांपैकी एक होते.तुम्ही थोडे लाजाळू स्वभावाचे असाल आणि आपल्या मनातील भावना सांगण्यास कचरत असाल तर या स्थितीत हे गाणे तुमच्यासाठी अगदी परफेक्ट म्हणायला हवे. ‘ छुपाना भी नहीं आता...जताना भी नहीं आता...’ हे ‘बाजीगर’चे गाणे तुम्ही ऐकायलाच हवे.


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :