इरफान खानच्या चित्रपटाचा स्विर्त्झलँडमध्ये होणार प्रिमीअर

इरफान खानच्या 'द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियंस' चित्रपटाचा प्रिमीअर स्विर्त्झलँडमध्ये होणार आहे. या वर्षाच्या अखेरीस हा चित्रपट रिलीज होणार आहे.

इरफान खानच्या चित्रपटाचा स्विर्त्झलँडमध्ये होणार प्रिमीअर
Published: 13 Jul 2017 05:52 PM  Updated: 13 Jul 2017 05:52 PM

इरफान खानच्या आगामी चित्रपट 'द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियंस' चित्रपटाचा प्रिमीअर स्विर्त्झलँडमध्ये होणार आहे. Locarno Film Festivalमध्ये या चित्रपटाचा प्रिमीअर करण्यात येणार आहे. हा चित्रपट राजस्थानवर आधारित आहे. अनुप सिंगने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. याचित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. राजस्थानमधल्या एका गावातल्या युवकाची भूमिका इरफान साकारतो आहे. तर हॉलिवूड अभिनेत्री गोल्फिश्ते फरहानी  इरफानच्या अपोझिट दिसणार आहे. गोल्फिश्ते फरहानी पहिल्यांदाच इरफान खानसोबत काम करते आहे. या वर्षाच्या अखेरीस 'द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियंस' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. इरफानने याआधीही हॉलिवूड चित्रपटा काम केले आहे.   
गोल्फिश्तेचा जन्म एक सांगितीक कुटुंबात झालेला असतो. कोणत्याही प्रकारच्या दु:खाचे भाव ती आपल्या गाण्यातून व्यक्त करण्यात माहिर असते.
इरफानचा काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या हिंदी मिडियम चित्रपट प्रेक्षकांचे विशेष प्रेम मिळाले होते. यातून शिक्षण व्यवस्थे संदर्भातले दाहक वास्तव अत्यंत हलक्या- फुलक्या स्वरुपात मांडण्यात आले होते. साकेत चौधरीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.  या चित्रपटात इरफान आपल्या मुलीला चांगले शिक्षण देऊ इच्छितो यासाठी तो तिला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकण्याचा प्रयत्न करत असतो. महिन्याभरात हिंदी मिडियमने ६५.४६ कोटी रूपयांची कमाई केली होती. पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर हीने इरफानच्या पत्नीची भूमिका साकारली होती. या  चित्रपटाचा सीक्वल येत असल्याची चर्चा आहे. या सीक्वलमध्येही इरफान खान आणि सबा कमर हीच जोडी दिसणार आहे.


कंगना राणौतचा सिमरन हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :