Birthday Special​ : अर्शद वारसीबाबत या गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का?

अर्शद वारसी या आज (१९ एप्रिल)हा वाढदिवस. १९ एप्रिल १९६८ साली जन्मलेल्या या अभिनेत्याने अपार संघर्षानंतर बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

Birthday Special​ : अर्शद वारसीबाबत या गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का?
Published: 19 Apr 2017 12:32 PM  Updated: 19 Apr 2017 12:32 PM

अर्शद वारसी या आज (१९ एप्रिल)हा वाढदिवस. १९ एप्रिल १९६८ साली जन्मलेल्या या अभिनेत्याने अपार संघर्षानंतर बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. 

अर्शदने सुरुवातीच्या काळात सेल्समॅन म्हणून काम केले होते. घरोघरी जावून सौंदर्य प्रसाधने विकून तो पैसे कमावयचा. अर्शदच्या बॉलिवूड करिअरबद्दल बोलायचे तर, महेश भट्ट यांचा असिस्टंट म्हणून तो इंडस्ट्रीत आला.अर्शदचे शालेय शिक्षण महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात झाले. मात्र गरिबीमुळे दहावीनंतर त्याने शिक्षण सोडून दिले.

गरिबीचे चटके सहन करत करत अर्शदने आधी सेल्समॅनचे काम केले. काही दिवस फोटो लॅबमध्येही काम केले. यानंतर एका डान्स ग्रूपमध्ये तो सहभागी झाला. यानंतर अर्शदचे नशीब त्याला एका वेगळ्याच वळणावर घेऊन गेले. या वळणावर त्याची बॉलिवूडमध्ये एन्ट्री  झाली.अनिल कपूर यांचा १९९३ मध्ये आलेला ‘रूप की रानी चोरों का राजा’ यातील ‘रोमिया नाम मेरा’ हे गाणे अर्शदनेच कोरिओग्राफ केले होते. हा चित्रपट आपटला पण हे गाणे तुफान लोकप्रीय झाले होते.अर्शदने अमिताभ बच्चन यांची कंपनी एबीसीएलद्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. अर्शदला जया बच्चन यांनी ‘तेरे मेरे सपने’ची आॅफर दिली होती, असे मानले जाते. १९९६ साली प्रदर्शित झालेल्या ‘तेरे मेरे सपने’ या चित्रपटामध्ये सह-नायकाची भूमिका करून अर्शद हिट झाला. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही.

सन २००५ मध्ये आलेल्या राजकुमार हिरानीच्या ‘मुन्ना भाई एम.बी.बी.एस.’ आणि ‘लगे रहो मुन्ना भाई’ या विनोदी चित्रपटांमध्ये सर्किटच्या भूमिकांसाठी वारसी लोकप्रिय झाला. इश्किया, जॉली एल.एल.बी. या चित्रपटांमधील भूमिकांसाठी देखील त्याचे कौतुक झाले. सध्या अर्शद गोलमाल सीरिजमध्ये बिझी आहे.अर्शदची पत्नी मारिया एक व्हीजे आहे. दोघांचीही भेट एका डान्स अ‍ॅकेडमीत झाली होती. दोघांमध्येही प्रेम फुलले आणि १९९९ मध्ये दोघांचे लग्न झाले.


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :