ही अभिनेत्री आहे भोजपूरीची ‘करिना कपूर’!

एक भोजपूरी नटी अर्थात अभिनेत्री पूनम दुबे सध्या चर्चेत आहे. मॉडेलिंग ते अ‍ॅक्टिंग असा प्रवास करणारी पूनम तिचा अभिनय आणि नृत्य यामुळे तशी चर्चेत असतेच. पण सध्या ती एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे.

ही अभिनेत्री आहे  भोजपूरीची ‘करिना कपूर’!
Published: 13 Sep 2017 03:07 PM  Updated: 13 Sep 2017 03:07 PM

भोजपूरी चित्रपटांचा आपला एक चाहता वर्ग आहे. मजेदार कथा, धमाकेदार गाणी आणि भूमिकांसाठी हे चित्रपट ओळखले जातात. अर्थात अलीकडे बॉलिवूडप्रमाणेच भोजपूरी चित्रपटांचे क्रेझही वाढते आहे. केवळ चित्रपटांचाच नाही तर भोजपूरी नट-नट्यांची क्रेझही आहे. अशीच एक भोजपूरी नटी अर्थात अभिनेत्री पूनम दुबे सध्या चर्चेत आहे. मॉडेलिंग ते अ‍ॅक्टिंग असा प्रवास करणारी पूनम तिचा अभिनय आणि नृत्य यामुळे तशी चर्चेत असतेच. पण सध्या ती एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. 



कशामुळे? तर तिच्या झिरो फिगरमुळे. होय, सध्या सगळेच पूनमच्या फिगरची तारीफ करताना थकत नाहीयेत. खरे तर भोजपूरी नायिका वजनाने अधिक असतात. पण भोजपूरी सिनेमांतील ही आघाडीची नायिका ही इमेज बदलून आपल्या झिरो फिगरवर सध्या काम करतेय आणि यात मी बºयाचअंशी यशस्वीही झाली आहे.


पूनमचे ताजे फोटो याचा पुरावा आहेत. अलीकडे पूनमने तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. ते पाहून पूनमचे चाहते अवाक् झालेत. पूनमने आपले वजन बरेच कमी केल्याचे यात स्पष्टपणे दिसतेय. 



पूनम दुबे सध्या भोजपूरी चित्रपट आणि प्रिंट शूटमध्ये कमालीची व्यस्त आहे.  सुंदर फिगरमुळे तर पूनमचे भाव चांगलचे वाढले आहेत. ‘रंगीला’, ‘मिशन बनारस’ असे तिचे सिनेम प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत.



पूनमच्या मते, एका अभिनेत्रीसाठी केवळ अभिनयच गरजेचा नाही तर भूमिकेनुसार स्वत:ला आणि स्वत:च्या शरिराला बदलणेही गरजेचे आहे. कदाचित म्हणूनच पूनम झिरो फिगरसाठी धडपडते आहे.  ही झिरो फिगर कुठल्या चित्रपटाची डिमांड तर नाही ना? हे आम्हाला ठाऊक नाही. स्वत: पूनम सुद्धा याबद्दल बोलायला तयार नाही. मॉडेलिंगमध्ये तुमची फिगर बरीच महत्त्वाची असते, केवळ इतकेच तुणतुणे सध्या ती वाजवतांना दिसतेय. अर्थात कारण काहीही असो, पण या फिगरमध्ये पूनम अधिकच सुंदर दिसू लागलीय. तुम्ही तिचे ताजे फोटो बघा अन् तुम्हाला काय वाटते, ते आम्हाला कळवा. 

RELATED ARTICLES


गोलमाल अगेन या वर्षातील सगळ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :