1 महिन्यात अक्षयच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केला कोटींचा बिझनेस.. वाचा सविस्तर

अभिनेता अक्षय कुमारचा टॉयलेट : एक प्रेम कथा चित्रपट रिलीज होऊन काही महिने होऊन गेले आहेत. याचित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवा रेकॉर्ड तयार केला आहे.

1 महिन्यात अक्षयच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केला कोटींचा बिझनेस.. वाचा सविस्तर
Published: 11 Sep 2017 04:21 PM  Updated: 11 Sep 2017 04:23 PM

अभिनेता अक्षय कुमारचा टॉयलेट : एक प्रेम कथा चित्रपट रिलीज होऊन काही महिने होऊन गेले आहेत. मात्र रिलीज झाल्यानंतर काही महिन्यानंतर ही हा चित्रपट अजून ही बॉक्स ऑफिसवर गल्ला जमावतो आहे. याचित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवा रेकॉर्ड तयार केला आहे. कारण हा चित्रपट अक्षयच्या करिअरमधला सर्वाधिक चित्रपट ठरला आहे. टॉयलेट: एक प्रेमकथा चित्रपटाने देशभरात आतपर्यंत 133.60 कोटींचा बिझनेस केला आहे. या आकड्यांसोबतच अक्षयने त्याचे 5 वर्षातला रेकॉर्ड ब्रेक केला आहे. याआधी अक्षयचा सर्वाधिक गल्ला जमावणारा चित्रपट रावडी राठोड होता ज्याने 131 कोटींचा बिझनेस केला होता.  ऐवढेच नाही तर 133 कोटींचा बिझनेस करत टॉयलेट : एक प्रेमकथा यावर्षातील सगळ्यात जास्त कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे. शाहरुख खानच्या रईसने 139 कोटींचा बिझनेस केला होता.  बाहुबली 2 डब चित्रपट असल्याने या स्पर्धेत तो येत नाही. 

ALSO READ : अक्षयकुमारची लाडकी लेक नितारा बनली दिग्दर्शक; पहा तिने शूट केलेला व्हिडीओ!

अक्षय कुमारचा चित्रपटात आजही बॉक्स ऑफिसवर सतत कमाई करताना दिसतो आहे. हा चित्रपट 20 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. चित्रपटाच्या बजेटच्या तुलनेत चित्रपटांने पाच पट कमाई केली आहे. सध्या तो गोल्डच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. गोल्डमध्ये तो बलवीर सिंग यांची भूमिका साकारणार आहे. देश स्वतंत्र झाल्यानंतर मिळालेल्या पहिल्या ऑल्पिमिंक गोल्ड मेडलवर आधारित आहे. भारताना 1948 साली हॉकीमध्ये गोल्ड जिंकले होते. अक्षय कुमारच्या 50 व्या वाढदिवसाचे औचित्य साधत गोल्डचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले. यानंतर अक्षय पॅडमॅनमध्ये सुद्धा दिसणार आहे. 


गोलमाल अगेन या वर्षातील सगळ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :