2 MAD च्या मंचावर डान्स गुरू रेमो डिसोजाचे बर्थ डे सेलिब्रेशन!

या कार्यक्रमातील स्पर्धकांचे नृत्य, त्यांच्यामध्ये असलेला नृत्याबद्द्लचा मॅडनेस, उत्साह, बघून रेमो आणि धर्मेश यांना देखील कार्यक्रमामध्ये स्पर्धकांसोबत डान्स करण्यास भाग पाडले.

2 MAD च्या मंचावर डान्स गुरू रेमो डिसोजाचे बर्थ डे सेलिब्रेशन!
Published: 03 Apr 2017 02:53 PM  Updated: 03 Apr 2017 02:53 PM

2 MADच्या मंचावर या आठवड्यात रेमो आणि धर्मेश यांनी हजेरी लावली. त्यांनी टॉप 8 स्पर्धकांसोबत बरीच धम्माल मस्ती केली. स्पर्धकांनी आपल्या नृत्याची झलक दाखवून रेमो सरांना थक्क केले. या कार्यक्रमातील स्पर्धकांचे नृत्य, त्यांच्यामध्ये असलेला नृत्याबद्द्लचा मॅडनेस, उत्साह, बघून रेमो आणि धर्मेश यांना देखील कार्यक्रमामध्ये स्पर्धकांसोबत डान्स करण्यास भाग पाडले.




या भागामध्ये प्रेक्षकांना एका पेक्षा एक अप्रतिम डान्स बघायला मिळणार आहेत. तुषारने ''बत्तमिज दिल''.... या गाण्यावर अफलातून नृत्य सादर करून रेमोचे मन जिंकले. तुषार तसेच इतर स्पर्धांसोबत रेमोने या गाण्यावर दोन स्टेप केल्या तर सोनलनेदेखील रेमोचे नृत्यदिग्दर्शकन केलेल्या ''पिंगा''...या गाण्यावर नृत्य सादर केले, या गाण्यावर दोन स्टेप खास प्रेक्षकांसाठी सादर केल्या.प्रतीक्षाने ''येऊ कशी प्रिया''' या गाण्यावर कॅब्रे डान्स केला तर पलकने अगदीच तिच्याहून वेगळी नृत्यशैली वापरत ''रखुमाई'' या गाण्यावर नृत्य सादर केले, तसेच राहुलने पॉपपिंग केले. 



तसेच  2 MAD च्या मंचावर रेमोला एक सरप्राईजही  मिळाले आणि  हे सरप्राईज पाहून तो पहिल्यांदाच टेलिव्हिजन शोवर भाऊक  झाल्याचे पाहायला मिळाले. ते सरप्राईझ म्हणजे रेमोचा वाढदिवस मंचावर साजरा करण्यात आला. तसेच धर्मेश एन्ट्री देखील स्पेशल ठरली.  



पब्लिसिटीसाठी इशा गुप्ता करतेय का बोल्ड फोटोशूट?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :