जॅकलिन सिध्दार्थच्या उपस्थितीने डान्स प्लसच्या सेटवर मनोरंजनाची धम्माल

जॅकलिनेही आपल्या डान्सिंग स्टाइलने रसिकांना घायाळ केले. तर सिध्दार्थनेही आपले सिक्सपॅक अॅब्स दाखवत स्टेजवर उपस्थित स्पर्धकानाही आश्चर्यचकित केल्याचे पाहायला मिळाले.

जॅकलिन सिध्दार्थच्या उपस्थितीने डान्स प्लसच्या सेटवर मनोरंजनाची धम्माल
Published: 16 Aug 2017 03:31 PM  Updated: 16 Aug 2017 03:31 PM

डान्स प्लसचा तिसरा सिझनही इतर सिझनप्रमाणे तुफान हिट ठरतोय.शोमध्ये सहभागी झालेले स्पर्धक एक से बढकर एक परफॉर्मन्स देत रसिकांचे फुल ऑन मनोरंजन करत आहेत.सध्या शोमध्ये सिनेमाच्या प्रमोशनसाठी सेलिब्रेटी या मंचावर हजेरी लावत आपल्या डान्सची झलक दाखवताना आपण पाहिलेत.
आता बॉलिवूडची अभिनेत्री आणि श्रीलंकन ब्यूटी क्वीन जॅकलिन फर्नांडिस आणि सिध्दार्थ मल्होत्रा त्यांचा आगामी सिनेमा‘अ जेंटलमॅन'च्या प्रमोशनसाठी आले होते.तर सेलिब्रिटीच्या डान्सचेही क्या कहने... यावेळी जॅकलिन आणि सिध्दार्थ दोघांनीही स्पर्धकांचे डान्स एन्जॉय करत स्पर्धकांसह थिरकताना दिसले. यावेळी जॅकलिनेही आपल्या डान्सिंग स्टाइलने रसिकांना घायाळ केले. तर सिध्दार्थनेही आपले सिक्सपॅक अॅब्स दाखवत स्टेजवर उपस्थित स्पर्धकानाही आश्चर्यचकित केल्याचे पाहायला मिळाले.त्यामुळे स्पर्धकांटीडान्समस्ती आणि जैकलिन सिध्दार्थच्या उपस्थितीने डान्स प्लसच्या सेटवर मनोरंजनाची धम्माल पाहणे रसिकांसाठी एक खास पर्वणी ठरणार आहे.'डान्स प्लस 3' सिझन कार्यक्रमाचा सूत्रसंचालन राघव जुयाल करत असून रेमो डिसूझा महागुरू तर शक्ती मोहन,धर्मेश येलांडे आणि पुनीत पाठक या शोला जज करत आहेत.डान्स प्लसच्या पहिल्या पर्वापासून या शोने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे.गेल्या सिझनमध्ये डान्स प्लसच्या दुस-या सिझनचे विजेतपद जळगावचा तनय मल्हारने जिंकले होते.अवघ्या १४ वर्षांचा सर्वात कमी वयाचं डान्सिंग आयकॉन होण्याचा मान त्याला मिळाला आहे. या शोमुळे  अनेक स्पर्धकांना वेगळी ओळख मिळाली आहे. डान्स प्रेमी आणि तरुणाईमध्ये डान्स प्लस शोची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत असून शोमधले स्पर्धक आपल्या भन्नाट डान्स स्टेप्सने सा-यांची मनं जिंकली आहेत.


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :