​विद्या बालनने दिल है हिंदुस्तानी या कार्यक्रमाच्या स्पर्धकाला शिकवला अभिनय

​विद्या बालन नुकतीच बेगम जान या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दिल है हिंदुस्तानी या कार्यक्रमाच्या सेटवर आली होती. तिने यावेळी स्पर्धकांच्या आवाजाचे कौतुक तर केले. पण त्याचसोबत स्पर्धकांना अभिनयाचे धडेदेखील दिले.

​विद्या बालनने दिल है हिंदुस्तानी या कार्यक्रमाच्या स्पर्धकाला शिकवला अभिनय
Published: 17 Mar 2017 02:19 PM  Updated: 17 Mar 2017 02:19 PM

बेगमजान या चित्रपटात विद्या बालन प्रेक्षकांना एका वेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन सुरू आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती अनेक रिअॅलिटी शोमध्ये सध्या हजेरी लावत आहे. नुकतीच ती या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दिल है हिंदुस्तानी या मालिकेच्या सेटवर गेली होती. या कार्यक्रमातील स्पर्धकांच्या आवाजाचे तर तिने कौतुक केले पण त्याचसोबत तिने या कार्यक्रमातील स्पर्धकांसोबत खूप मजा मस्ती केली. या कार्यक्रमातील बंगाली स्पर्धकांसोबत तिचे ट्युनिंग खूप छान जमले होते. 
दिल है हिंदुस्तानी या कार्यक्रमात प्रेक्षकांना एक आई आणि मुलीची जोडी पाहायला मिळत आहे. या जोडीने एकापेक्षा एक सरस परफॉर्मन्स देत प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. आता या मायलेकीच्या जोडीने विद्या बालनेकडूनदेखील प्रशंसा मिळवली. या दोघीही विद्याच्या खूप मोठ्या चाहत्या आहे. त्यामुळे विद्या आपले कौतुक करत आहे हे ऐकून त्या खुश झाल्या. विद्याला या दोघींचाही आवाज खूपच आवडला.
विद्याने या कार्यक्रमात डर्टी पिक्चर, बेगम जानमधील काही संवाददेखील म्हणून दाखवले. त्याचसोबत भूलभूलैय्या या चित्रपटातील अभिनयदेखील करून दाखवला. भूलभूलैय्या या चित्रपटात मोंजुलिका आमी मोंजुलिका हा संवाद दोन वेगळ्या आवाजात बोलत असल्याचे आपण पाहिले आहे. हा संवादही तिने म्हणून दाखवला. सस्वतीला हा संवाद प्रचंड आवडल्याने तिनेदेखील हा संवाद म्हणण्याचा प्रयत्न केला. विद्याचा हा संवाद ऐकून प्रेक्षक थक्कच झाले होते. भूलभूलैय्या या चित्रपटातील दुसरा आवाजही विद्याचाच असल्याची यामुळे सगळ्यांना खात्री पटली. या कार्यक्रमाद्वारे तिने या कार्यक्रमाच्या स्पर्धकांना अभिनयाचे चांगलेच धडे दिले. 


गोलमाल अगेन या वर्षातील सगळ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :