​कुमकुम भाग्य या मालिकेसाठी श्रुती झाचा नवा लूक

​कुमकुम भाग्य या मालिकेत श्रुती झा आता मुन्नी ही भूमिका साकारणार असून या मालिकेतील तिचा लूक हा एखाद्या गावातील मुलीप्रमाणे असणार आहे.

​कुमकुम भाग्य या मालिकेसाठी श्रुती झाचा नवा लूक
Published: 11 Jul 2017 12:35 PM  Updated: 11 Jul 2017 12:35 PM

कुमकुम भाग्य या मालिकेतील श्रुती झाचे काम प्रेक्षकांना खूपच आवडते. गेली तीन वर्षं ती या मालिकेचा भाग आहे. श्रुतीने गेल्या तीन वर्षांत या मालिकेत विविध भूमिका साकारल्या आहेत. या सगळ्याच भूमिका एकमेकांपेक्षा वेगळ्या असूनही तिने त्या खूप चांगल्या प्रकारे साकारल्या आहेत. एक अभिनेत्री म्हणून तिने या मालिकेद्वारे स्वतःला सिद्ध केले आहे. केवळ आपल्या वेशभूषेद्वारेच नव्हे तर आपल्या देहबोलीने तिने ही भूमिका जिवंत केली आहे. आता या मालिकेत श्रुती प्रेक्षकांना एका वेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहे. 
कुमकुम भाग्य या मालिकेत आता श्रुती एका गावाकडच्या मुलीप्रमाणे घागरा-चोळी घालणार आहे. ती आता मुन्नी ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. मुन्नी ही अनाथ आहे. तिच्या बहिणीने तिचा सांभाळ केलेला आहे. पण एका अपघातात तिच्या बहिणीचा आणि बहिणीच्या पतीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बहिणीच्या दोन मुलींना सांभाळण्याची जबाबदारी तिच्यावर आली आहे. कुंकू, बांगड्या, बिंदी अशा वस्तू विकून ती दोघांचे पालनपोषण करत आहे. आपल्या या नव्या रूपाबद्दल स्मृती सांगते, कुमकुम भाग्य ही मालिका माझ्यासाठी खूप खास आहे. मुन्नी ही भूमिका साकारणे हे माझ्यासाठी आव्हानात्मक आहे. पण हे आव्हान मी स्वीकारलेले आहे. ही व्यक्तिरेखा उभी करण्यासाठी मालिकेची संपूर्ण टीम मला मदत करत आहे. ही भूमिकादेखील प्रेक्षकांना आवडेल अशी मला खात्री आहे.
कुमकुम भाग्यच्या पुढील भागात अभी परत आल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे तर पूरब प्रज्ञाचा मृतदेह शोधण्यासाठी पोलिसांना विनंती करणार आहे. 

Also Read : ​कुमकुम भाग्य फेम शब्बीर आहुवालियाची पत्नी ​कांची कौलचा कमबॅक


पद्मावती चित्रपटाला होत असलेला विरोध योग्य आहे असे तुम्हाला वाटते का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :