सचिन खेडेकर बनले सूत्रसंचालक

प्रेक्षकांचे लाडके कलाकार हे आता सूत्रसंचालन करण्यास पसंती देत असल्याचे पाहायला मिळत आहे. अभिनेता रितेश देशमुख, स्वप्नील जोशी यांच्यापाठोपाठ आता प्रेक्षकांचा लाडका अभिनेता सचिन खेडेकर देखील सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी पार पाडत असल्याचे पाहायला मिळत आहे.

सचिन खेडेकर बनले सूत्रसंचालक
Published: 25 Nov 2016 11:15 PM  Updated: 25 Nov 2016 05:47 PM

प्रेक्षकांचे लाडके कलाकार हे आता सूत्रसंचालन करण्यास पसंती देत असल्याचे पाहायला मिळत आहे. अभिनेता रितेश देशमुख, स्वप्नील जोशी यांच्यापाठोपाठ आता प्रेक्षकांचा लाडका अभिनेता सचिन खेडेकर देखील सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी पार पाडत असल्याचे पाहायला मिळत आहे.  शौर्य गाथा अभिमानाची असे या मालिकेचे नाव आहे. त्यांचा दर्जेदार आवाज या कार्यक्रमाला मिळणार आहे. सचिन खेडेकर यांना अभिनय करताना पाहणे नेहमीच प्रेक्षकांना आवडते, मात्र यावेळी त्यांच्या आवाजातील अभिनय प्रेक्षकांना ऐकायला मिळेल. नुकतेच  २६/११ चा हल्ला या पार्श्वभूमीवर झी युवावर  शौर्य गाथा अभिमानाची चा मुहूर्ताचा एपिसोड  २५/११ ला झी युवावर प्रदर्शित करण्यात आला आहे. तसेच या कार्यक्रमाचे पोस्टरदेखील लाँच करण्यात आले आहे. त्यावेळी  या मालिकेची पहिली स्टोरी ज्या शूर अधिकाºयांवर आहे आणि ज्यांच्या नजरेतून हि घटना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर इसाक बागवान आणि सुरेश वाल्ली शेट्टी यांच्या हस्ते या मालिकेचे पोस्टर लाँच करण्यात आले आहे. त्यानंतर झी युवाचे बिझिनेस हेड बवेश जानवलेकर आणि दिग्दर्शक सचिन मोहिते यांनी पत्रकारांबरोबर शौर्य गाथा अभिमानाची या कार्यक्रमाबद्दल बातचीत केली आहे. कार्यक्रमाचे आजच्या पिढीसाठीचे असेलेले महत्व यावेळी सांगण्यात आले आहे.  या मालिकेचे दिग्दर्शन सावधान इंडियाचे दिग्दर्शक जास्वन्द एंटरटेनमेंट चे सचिन मोहिते असून ,लेखन दगडी चाळ सिनेमाचे गाजलेले लेखक अजय ताम्हाणे, त्याच बरोबर कलादिग्दर्शक विवेक देशपांडे, छायांकन शाहिद आणि संगीत प्रसिद्ध संगीतकार अमितराज यांनी केले आहे.

हाफ गर्लफ्रेंड हिंदी मीडियमवर भारी पडेल असे तुम्हाला वाटते का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :