​शमिता शेट्टी, गौरव पांडे आणि रिधिमा पंडित झळकणार यो के हुआ ब्रो या वेबसिरिजमध्ये

​शमिता शेट्टी, गौरव पांडे आणि रिधिमा पंडित हे कलाकार यो के हुआ ब्रो या वेबसिरिजमध्ये झळकणार आहेत. गौरव आणि रिधिमा हे छोट्या पडद्यावरचे प्रसिद्ध कलाकार आहेत.

​शमिता शेट्टी, गौरव पांडे आणि रिधिमा पंडित झळकणार यो के हुआ ब्रो या वेबसिरिजमध्ये
Published: 18 Aug 2017 02:16 PM  Updated: 18 Aug 2017 02:16 PM

यो के हुआ ब्रो ही वेबसिरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ही वेबसिरिज केवळ पाचच भागांची आहे. या बेवसिरिजमध्ये शमिता शेट्टी, गौरव पांडे आणि रिधिमा पंडित प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. 
यो के हुआ ब्रो या वेबसिरिजची कथा हरयाणामधील एका छोट्याशा गावातील आहे. हरियाणा हा प्रदेश पुरुषप्रधान मानला जातो. तेथील दोन मित्र मुलींना डेट करणे, आयुष्य मजामस्तीत घालवणे याप्रकारे आपले आयुष्य जगत असतात. पण या सगळ्यात आपण कधी अडकू शकतो याचे देखील त्यांना भान नसते. पण ते एका संकटात अडकतात आणि पुढे त्यांचे काय होते याची गंमत या वेबसिरिजमध्ये पाहायला मिळणार आहे. ही वेबसिरिज पाहाताना प्रेक्षक खळखळून हसणार यात काहीच शंका नाही.
शमिताने मोहोब्बते, फरेब, हे बेबी यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. बिग बॉस आणि झलक दिखला जा यांसारख्या रिअॅलिटी शोमध्ये देखील ती झळकली होती. वेबसिरिजमध्ये काम करण्याची ही तिची पहिलीच वेळ आहे. या वेबसिरिजमधील तिच्या भूमिकेविषयी शमिता सांगते, मी या वेबसिरिजमध्ये सुमन ही भूमिका साकारणार असून ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आवडेल अशी मला खात्री आहे. 
यो के हुआ ब्रो या वेबसिरिजमध्ये सुमित व्यास, अपारशक्ती खुराना देखील मुख्य भूमिकेत झळकणार आहे. वेबसिरिजमधील भूमिकेविषयी अपारशक्ती खुराना सांगतो, या वेबसिरिजमध्ये मी पियुषची भूमिका साकारत आहे. त्याची आणि महेंद्रची म्हणजेच गौरव पांडेची खूप घट्ट मैत्री आहे. या वेबसिरिजमध्ये एक वेगळा विषय हाताळायला मिळाला असल्याने मी खूपच खूश आहे. ही माझी पहिलीच वेबसिरिज असून यात काम करताना मला खूपच मजा आली. 


कंगना राणौतचा सिमरन हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :