सरस्वतीचा नवा लूक तुम्ही पाहिला का?

सरस्वती या मालिकेत प्रेक्षकांना सरस्वती म्हणजेच तितिक्षा तावडेचा नवा लूक पाहायला मिळणार आहे.

सरस्वतीचा नवा लूक तुम्ही पाहिला का?
Published: 01 Sep 2017 03:42 PM  Updated: 01 Sep 2017 03:42 PM

सरस्वती मालिकेमध्ये गणपतीचे आगमन धुमधडाक्यात झाले असून गणपतीच्या आगमनाने सरस्वतीच्या घरातील वातावरण प्रसन्न झाले आहे. बाप्पाच्या आगमनानंतर सरस्वतीने त्याच्या महाप्रसादासाठी ११०१ मोदक देखील केले. सरस्वतीच्या हरतालिकेच्या पूजेपासून ते बाप्पाच्या प्रसाद करण्यापर्यंत विद्युलने तिच्या मार्गामध्ये अनेक अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. परंतु सरस्वतीने विद्युलच्या प्रत्येक प्रयत्नांना उलटून लावून बाप्पाच्या आगमनामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता भासू दिली नाही. गावातील गणपतीच्या आरतीचा मान देखील सरस्वतीला मिळाला. पण आता गणपती बाप्पाच्या विसर्जनाची वेळ आली आहे. मुळातच बाप्पा विघ्नहर्ता असल्यामुळे सरस्वतीसमोर आलेली विघ्न देखील तो दूर करेल, तिला तो योग्य मार्ग दाखवेल याची सगळ्यांना खात्री आहे. 
बाप्पाच्या विसर्जनासाठी सरस्वती मालिकेमध्ये ढोल पथक आणण्यात आले आहे. मालिकेमध्ये ढोल, ताशाच्या धुमधडाक्यात गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात येणार आहे. बाप्पाला निरोप देण्यासाठी सरस्वती देखील पारंपरिक पद्धतीने तयार झाली असून तिने पांढरा पंजाबी ड्रेस, पिवळ्या रंगाची ओढणी, नाकामध्ये नथ आणि फेटा परिधान केले आहे. या वेशात ती खूपर सुंदर दिसते आहे. 
गणपती विसर्जनाच्या दिवशी राघवला दुखापत करण्याचा कट विद्युलने रचला आहे त्यासाठी तिने मिरवणुकीमध्ये मारेकरीला देखील पाठवले आहे. याआधी देखील विद्युलने असा राघवला मारण्याचा प्रयत्न केला होता. पण यावेळेस राघवला दुखापत करण्याच्या प्रयत्नात विद्युलला यश मिळेल? आणि देविका बोलू शकते हे सत्य राघवला कसे कळेल? सरस्वतीला विद्युलचे सत्य कळल्यावर ती काय करेल? याची उत्तरे प्रेक्षकांना लवकरच सरस्वती या मालिकेत मिळणार आहेत. 

Also Read : मिलिंद शिंदे झळकणार सरस्वती या मालिकेत


गोलमाल अगेन या चित्रपटाबाबत उत्सुक आहात का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :