​संग्राम साळवी कुलस्वामिनी या मालिकेत

​संग्राम साळवीचा छोट्या पडद्यावर लवकरच कमबॅक होणार आहे. संग्राम कुलस्वामिनी या मालिकेत काम करणार असून या मालिकेत तो एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.

​संग्राम साळवी कुलस्वामिनी या मालिकेत
Published: 16 May 2017 11:44 AM  Updated: 16 May 2017 04:26 PM

देवयानी या मालिकेतील भूमिकेसाठी संग्राम साऴवी चांगलाच प्रसिद्ध झाला होता. या मालिकेतील तुमच्यासाठी काय पण हा त्याचा संवाद तर प्रचंड गाजला होता. या मालिकेनंतर संग्राम अनेक मालिकांमध्ये झळकला. तसेच त्याने मितवा या चित्रपटातदेखील काम केले होते. आता संग्राम प्रेक्षकांना एका नव्या मालिकेत पाहायला मिळणार आहे. कुलस्वामिनी ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या प्रोमोमध्ये बाहुबली फिव्हर आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण बाहुबलीमध्ये प्रभासने शिवलिंग खांद्यावर उचलला होता आणि या मालिकेच्या प्रोमोमध्ये संग्राम साळवीने बाहुबलीप्रमाणे देव्हारा खांद्यावर उचलून घेतल्याचे दिसत आहे.
कुलस्वामिनी या मालिकेच्या प्रोमोमध्ये संग्राम या घरात देवीला स्थान नाही असे म्हणून देव्हारा उचलताना आपल्याला दिसत आहे. त्यामुळे आता या मालिकेचे कथानक काय असणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. 
संग्राम या मालिकेद्वारे कित्येक वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. स्टार प्रवाह या वाहिनीवरील देवयानी या मालिकेने त्याला खरी लोकप्रियता मिळवून दिली. त्यामुळे पुन्हा याच वाहिनीसोबत काम करण्यास संग्राम प्रचंड उत्सुक आहे. 
संग्रामला ही मालिका मिळाल्यामुळे तो प्रचंड खूश आहे. पण त्याचसोबत सध्या तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही प्रचंड आनंदित आहे. संग्रामचा काहीच दिवसांपूर्वी अभिनेत्री खुशबू तावडे सोबत साखरपुडा झाला. खुशबू आणि संग्रामने अतिशय साधेपणाने साखरपुडा केला. खुशबू तावडे हे नाव केवळ मराठी इंडस्ट्रीतच नव्हे तर हिंदी इंडस्ट्रीतदेखील तितकेच प्रसिद्ध आहे. तिने तू भेटशी नव्याने, पारिजात यांसारख्या मराठी मालिकांमध्ये काम केले असून तारक मेहता का उल्टा चष्मा, सिंहासन बत्तीसी यांसारख्या हिंदी मालिकांमध्ये ती झळकली आहे. तिने नुकतेच तेरे बीन या मालिकेत काम केले होते. तिच्या या मालिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. 


गोलमाल अगेन या वर्षातील सगळ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :