चक्क या कारणामुळे माधुरी संजीव यांनी नावातच केला बदल,नाहीतर आज त्याही राहिल्या असत्या माधुरी दिक्षित!वाचा सविस्तर

'काहे दिया परदेस' मालिकेत माधुरी संजीव यांनी शीवच्या आईची भूमिका साकारली होती.त्यांच्या या भूमिकेला इतर भूमिकांप्रमाणेच तुफान पसंती मिळाली होती.

चक्क या कारणामुळे माधुरी संजीव यांनी नावातच केला बदल,नाहीतर आज त्याही राहिल्या असत्या माधुरी दिक्षित!वाचा सविस्तर
Published: 06 Jun 2018 05:49 PM  Updated: 06 Jun 2018 05:49 PM

कलाकार त्यांच्या अभिनयाने रसिकांची मने जिंकतात. रसिकांच्या मनावर ते अधिराज्य गाजवतात. रसिकांच्या मनात या कलाकारांची नावं घर करुन असतात. रसिकांच्या मनात या कलाकारांच्या अभिनयासह त्यांची नावं घर करुन असतात.या कलेच्या दुनियेत कलाकार नाव कमावण्यासाठी येतात. त्यांच्या नावानेच त्यांची वेगळी ओळख निर्माण होत असते.मात्र अनेकदा असेही होते की सेम टु सेम नाव असल्यामुळे  कलाकारांना ओळखण्यात गल्लत होण्याचीही शक्यता असते.कलाकारांच्या भूमिकेच्या नावाप्रमाणेच त्यांचे खरं नाव रसिकांच्या लक्षात असते. त्यामुळेच असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी चक्क नावातच बदल करत आपली नवी ओळख निर्माण करत रसिकांच्या मनात घर करतात.अनेक कलाकारांचे खरे नाव फार कमी जणांना माहित आहेत.नुकतेच टीव्ही अभिनेत्री माधुरी संजीव यांनीही आजपर्यंत कोणालाही माहिती नसलेली त्यांची एका खास गोष्टीचा खुलासा केला आहे.एका मुलाखतीत माधुरीने सांगितले की आपले खरे नाव माधुरी दीक्षित असेच आहे.या आश्चर्यकारक माहितीबद्दल ती म्हणाली, “लोकांना मी माझं नाव माधुरी दीक्षित आहे, असं सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यांपुढे हिंदी चित्रपटांतील धकधक गर्ल माधुरी दीक्षितच येत असे. त्यामुळे हे माझं खरं नाव आहे, यावर त्यांचा विश्वास बसत नसे. बरेचदा लोकांना मी चेष्टा करत असल्याचे वाटायचे.आणि ते माझं म्हणणं गांभीर्याने घेत नसत. एक अभिनेत्री म्हणून मी माधुरी दीक्षितचा खूप आदर करते आणि माझ्या नावामुळे लोकांचा गैरसमज होऊ नये, अशीच माझी इच्छा होती. तेव्हा मी माझं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आणि आता मी माझ्या  नावापुढे माधुरी संजीव असे लावते. संजीव हे माझं मधलं नाव आहे.” सुमारे दशकभरापूर्वी माधुरी संजीवने आपल्या कारकीर्दीला प्रारंभ केला आणि हँसी तो फँसी, आप मुझे अच्छे लगने लगे यासारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक टीव्ही मालिकांमध्ये तिने भूमिका रंगविल्या. ‘कृष्णा चली लंडन’ मालिकेत तिची राधेच्या आईची व्यक्तिरेखा ही पारंपरिक भारतीय मातेची असून राधेच्या वडिलांनंतर घरात तिचा अधिकार चालत असे.तसेच मराठी मालिका 'काहे दिया परदेस' मालिकेत माधुरी संजीव यांनी शीवच्या आईची भूमिका साकारली होती.त्यांच्या या भूमिकेला इतर भूमिकांप्रमाणेच तुफान पसंती मिळाली होती.पडद्यावरील काहे दिया परदेस ही मालिका रसिकांना चांगलीच भावली होती.बनारसचा छोरा शिव आणि मराठमोळी गौरी यांची प्रेमकहानी रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली होती. 


‘कृष्णा चली लंडन’ मालिकेची नावीन्यपूर्ण कथा आणि राधा-कृष्णाच्या अनोख्या प्रेमकथेमुळे प्रेक्षकांमध्ये या मालिकेची चर्चा सुरू आहे. चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये अनेक दशके भूमिका रंगविलेले काही कलाकार या मालिकेत भूमिका साकारीत आहेत.अशाच एका कलाकारचे नाव आहे माधुरी संजीव.मालिकेचा नायक राधे (गौरव सरीन) याची आई शुक्लेन हिची भूमिका माधुरी संजीव साकारत आहे.


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :