​‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत या भूमिकेत दिसणार नसिरुद्दिन आणि रत्ना पाठक यांचा मुलगा विवान शहा

‘स्टार प्लस’वरील ‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ या आगामी मालिकेतील भूमिकेद्वारे विवान शहा टीव्ही मालिकांमध्ये पदार्पण करत आहे. या आगामी मालिकेत तो एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.

​‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत या भूमिकेत दिसणार नसिरुद्दिन आणि रत्ना पाठक यांचा मुलगा विवान शहा
Published: 17 May 2018 02:29 PM  Updated: 17 May 2018 02:29 PM

‘हॅपी न्यू इयर’ चित्रपटात भूमिका साकारलेला विवान शहा ‘स्टार प्लस’वरील ‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ या आगामी मालिकेतील भूमिकेद्वारे टीव्ही मालिकांमध्ये पदार्पण करत आहे. अनेक अभिनेते आपल्या भूमिकांमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी विविध माध्यमांमध्ये भूमिका साकारताना दिसत असून आता विवान शहा ‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ या आगामी मालिकेत एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेसाठी निर्मात्यांना एका नव्या, ताज्या आणि तरुण चेहऱ्याची गरज होती. नसिरुद्दिन शहा आणि रत्ना पाठक यांचा मुलगा विवान हा या निकषांत अचूक बसत होता. अर्थात विवान याची औपचारिक नियुक्ती करण्यात आलेली नसली, तरी तो लवकरच निर्मात्यांना भेटेल आणि येत्या आठवड्यात चित्रीकरणाला प्रारंभ करील, अशी अपेक्षा आहे.
एका लहान मुलीच्या सर्वसामान्यांपेक्षा वेगळ्‌या अशा बालपणाची कथा मरियम खान-रिपोर्टिंग लाइव्ह मध्ये रसिकांना पाहायला मिळणार आहे. ही एक हृदय पिळवटून टाकणारी कथा आहे आई आणि मुलीची. सोनाक्षी सावे या मालिकेत ७ वर्षीय मुलगी मुसकानची भूमिका साकारत आहे. मुसकान एखाद्या बाहुलीसारखी दिसते. ती फ्रॉक घालते आणि दोन पोनीटेल्स बांधते. तिच्या फ्रॉक्सचे वैशिष्ट्‌य हे आहे की ते जुन्या साड्‌या आणि ड्रेसेस वापरून बनवण्यात आले आहेत. ही व्यक्तिरेखा अनेक नकार, धोके, असुरक्षितात आणि कठीण गोष्टींना सामोरी जाते, पण या गोष्टींचा या छोट्‌या मुलीला सामना करावा लागत नाही. त्यांचा सामना तिची आई आरती ऊर्फ अरीना डे करते. सोनाक्षीने मुसकानच्या रूपात उत्तम काम केले असून कदाचित तिच्याशिवाय आणखी कोणी ही भूमिका साकारूच शकले नसते. सोनाक्षी तिच्या या मालिकेतील भूमिकेविषयी सांगते, “मुसकानची भूमिका साकारण्याबद्दल मी अतिशय उत्साहात आहे. आमच्या पहिल्या प्रोमोसाठी अख्ख्या टीमचे खूप कौतुक करण्यात आले असून सगळेच हा शो पाहण्यासाठी उत्सुक आहोत. मला खात्री आहे की, लोकांना या शो चा लूक आणि व्यक्तिरेखा नक्कीच आवडेल.”

Also Read : ​बिग बी अमिताभ बच्चनहे आहेत ‘मरियम खान-रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेतीला या बालकलाकाराचे फॅन!


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :