नंदेश उमप यांची लोकगीतांची मैफल "सरगम" मध्ये सजणार

दिवगंत लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी आपल्या घरात जी लोकसंगीताची गायकी रुजवली आणि जोपासली, तीच त्यांच्या पश्चात नंदेश उमप सांभाळत आहेत.

नंदेश उमप यांची लोकगीतांची मैफल "सरगम" मध्ये सजणार
Published: 13 Mar 2017 01:46 PM  Updated: 13 Mar 2017 01:46 PM

पॉप आणि रॉकच्या जमान्यात लोकसंगीताकडे आजची पिढी पाठ फिरवत असल्याचं दिसून येतं. लोकसंस्कृती आणि लोकपरंपरेची ओळख गायक नंदेश उमप यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून लोकसंगीताचा वारसा जपला आहे. आता छोट्या पडद्यावर नंदेश उमप यांची सुरेल नजराणा रसिकांना अनुभवता येणार आहे.दिवगंत लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी आपल्या घरात जी लोकसंगीताची गायकी रुजवली आणि जोपासली, तीच त्यांच्या पश्चात नंदेश उमप सांभाळत आहेत.लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्याबरोबर वयाच्या आठव्या वर्षी नंदेश उमप रंगमंचावर गायला उभे  राहिले .तेव्हापासून जवळजवळ पंचवीस-तीस वर्षं नंदेश त्यांच्याबरोबर, त्यांच्या साथसंगतीने गात होते,घडत होते. लोकसंगीताची परंपरा उमप  घराण्याच्या आवाजाने महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात दुमदुमुन निघाली  . लोकसंगीताचा हाच वारसा झी युवा, "सरगम "या कार्यक्रमाद्वारे एका नव्या रूपात या बुधवारी १५ मार्च आणि गुरुवारी १६ मार्च ला रात्री ९ वाजता महाराष्ट्रासमोर घेऊन येत आहे.

दिवगंत लोकशाहीर विठ्ठल उमपांबरोबर गाण्याच्या अनुभवामुळे  'ये दादा आवार ये...' म्हणणाऱ्या कोळणीपासून ते 'नाय बा किस्ना असून उपकाल, संगत तुजी नाई बली ले' म्हणणाऱ्या पेंद्याच्या बोबड्या गवळणीपर्यंत लोकशाहिरांची गायकी नंदेश यांनी  उचलली. घराणंच लोकसंगीतकारांचं असल्यामुळे त्यासाठी लागणारा खुल्या आवाजाचा बाज नंदेश यांच्याकडे जन्मतःच होता. पण शाहिरांच्या म्हणजे विठ्ठल उमपांच्या अस्सल गावरान गायकीचा वारसा त्यांना मिळाला आणि त्याची गायकी उजळून निघाली. लोकशाहिरांचा ४३ मीटरचा पायघोळ अंगरखा अंगावर चढवत,थेट त्यांच्याच थाटात 'द्रोपदीचं मन पाकुळलं' म्हणत रंगभूमीवर उभे  राहिले.मात्र वडिलांबरोबर सावलीसारखं वावरतानाही, नंदेश यांनी  स्वतःचं स्वातंत्र्य जपलं. वेगळेपण अधोरखित केलं. त्याचमुळे नाटक-सिनेमांपासून ते दूरदर्शन मालिकांपर्यंत त्याने आपल्या गाण्याचा ठसा उमटवला आहे."सरगम" या कार्यक्रमात नंदेश उमप त्यांनी गायलेली अनेक उत्तमोत्तम गाणी गाणार आहेत जी प्रेक्षकांना भारावून सोडतील मंत्रमुग्ध करतील.त्यांच्या सरगमच्या दोन भागात ते प्रेक्षकांसमोर गणाला , सुबरान , मळ्याच्या मळ्या मंदी,केसरीया बालम,माझ्या आईचा गोंधळ,दार उघड बया,अवचितला परिमालू,मल्हारवारी,माझ्या कान्हडया मल्हारी,माझी मैना गावांकडे राहिली दमादम मस्त कलंदर हि आणि अशी अनेक गाणी सादर करणार आहेत.

RELATED ARTICLES


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :