लक्ष्मी सदैव मंगलम् या मालिकेमध्ये लक्ष्मीच्या हाताला लागली मेहेंदी

लक्ष्मी लवकरच तिच्या नव्या आयुष्यात पाऊल ठेवणार आहे, दारी नवर देवाची वरात येणार आहे. परंतु या सगळ्यामध्ये मामीची कारस्थानं सुरूच आहेत. आता लक्ष्मीच्या हाताला मेहेंदी लागणार आहे.

लक्ष्मी सदैव मंगलम् या मालिकेमध्ये लक्ष्मीच्या हाताला लागली मेहेंदी
Published: 13 Jun 2018 04:04 PM  Updated: 13 Jun 2018 04:04 PM

कलर्स मराठीवरील लक्ष्मी सदैव मंगलम् या मालिकेमध्ये सध्या लक्ष्मीच्या लग्नाची तयारी सुरू आहे. लक्ष्मी सुद्धा बरीच आनंदी आहे. कारण आता तिला तिच्या स्वप्नातला राजकुमार लवकरच मिळणार आहे. दारी मंडप सजला आहे, लग्नाची लगबग सुरू झाली आहे. लक्ष्मी लवकरच तिच्या नव्या आयुष्यात पाऊल ठेवणार आहे, दारी नवर देवाची वरात येणार आहे. परंतु या सगळ्यामध्ये मामीची कारस्थानं सुरूच आहेत. आता लक्ष्मीच्या हाताला मेहेंदी  लागणार आहे. त्यातलेच काही क्षण आणि लक्ष्मीचा आनंद तुम्ही या फोटोमध्ये मध्ये बघू शकता. 
नवरी मुलीच्या हाताला मेहेंदी लावताना तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नावं लिहितात असं म्हणतात... लक्ष्मीचा हात कोणाच्या हाती जाईल? तिच्या स्वप्नातला राजकुमार कोण असेल? अशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या मालिकेत मिळणार आहेत.
नुकतीच सुरु झालेली लक्ष्मी सदैव मंगलम् ही मालिका सध्या बरीच चर्चेमध्ये आहे. विशेषकरून प्रेक्षकांना प्रत्येक भागामध्ये दिसणारे गावाचे सौंदर्य आणि मालिकेमधील कलाकार. गावामध्ये वाढलेली अवखळ, लाघवी, प्रेमळ अशी लक्ष्मी म्हणजे समृद्धी केळकर प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. या मालिकेमध्ये मल्हार म्हणजेच ओमप्रकाश शिंदे, आर्वी म्हणजेच सुरभी हांडे प्रेक्षकांना मुख्य भूमिकेत दिसत आहेत यांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. आता मालिकेमध्ये लक्ष्मीच्या लग्नाचा विवाहसोहळा रंगणार आहे. शुभ पावलांनी गावात येऊन सगळ्यांचीच लाडकी बनलेल्या या लक्ष्मीच्या लग्नाची तयारी म्हणजे मंडप लावणे, मेहेंदीची तयारी मोठ्या उत्साहात गावामध्ये सुरु झाली आहे. लक्ष्मीची आजी तिला लहानपणापासून सांगत असलेल्या स्वप्नातला राजकुमार आता खरोखरच तिच्या आयुष्यात येणार आहे.आपलं आयुष्य आता हा राजकुमार प्रेमाने बहरुन टाकणार अशा स्वप्नांमध्ये लक्ष्मी आहे आणि मोठ्या आनंदाने लग्नाची तयारी करत आहे. 
अनभिज्ञ अवखळ, सगळ्यांवर नि:स्वार्थपणे प्रेम करणारी, स्वछंदी लक्ष्मी जी आयुष्यभर ओंजळीत निखारे आणि ओठी हसू घेऊन वावरली तिच्या नशिबी मल्हार खरोखर सुखाची चाहूल घेऊन येईल का? तिचं लग्न कोणाशी होईल मल्हार, श्रीकांत कि अविनाशचा मुलगा? या सगळ्या निरुत्तरित प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना याच आठवड्यामध्ये मिळणार आहेत.

Also Read : ​लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेच्या सेटवरील लक्ष्मी आणि बाब्याची धम्माल!


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :