​क्या कसूर है अमला का फेम पंखुरी अवस्थीने सोडले तिचे घर

क्या कसूर है अमला का या मालिकेत अमला ही भूमिका साकारणाऱ्या ​पंखुरी अवस्थीने नुकतेच तिचे घर बदलले आहे. तिचा दिवसातील जास्तीत जास्त वेळ हा चित्रीकरणात जातो आणि त्यातही तिचे घर सेटपासून दूर असल्याने तिला अनेक तास प्रवास करावा लागत होता. त्यामुळे तिने घर बदलण्याचा निर्णय घेतला.

​क्या कसूर है अमला का फेम पंखुरी अवस्थीने सोडले तिचे घर
Published: 08 Apr 2017 11:22 AM  Updated: 08 Apr 2017 11:22 AM

क्या कसूर है अमला का या मालिकेत पंखुरी अवस्थी प्रमुख भूमिकेत साकारत आहे. ही मालिका फातमागुल या टर्किश शोवर आधारित आहे. या मालिकेत साध्याभोळ्या अमलाचे आयुष्य प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या मालिकेत अनेक दिग्गज कलाकारदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या मालिकेत ती प्रमुख भूमिकेत असल्याने तिचे कमीतकमी दहा-बारा तास चित्रीकरणात जातात. ही मालिका प्रेक्षकांना अधिकाधिक आवडावी यासाठी मालिकेची संपूर्ण टीम रात्रंदिवस प्रचंड मेहनत घेत आहे. पंखुरी तर भूमिका चांगली व्हावी यासाठी भूमिकेचा अभ्यासदेखील करत आहे. पंखुरी तिच्या आई वडिलांसोबत गेल्या कित्येक महिन्यांपासून वांद्रे येथे राहात आहे. तर तिच्या मालिकेचा सेट हा गोरेगाव परिसरात आहे. त्यामुळे तिला सेटवर पोहोचायला आणि सेटवरून घरी जायला खूपच वेळ लागत होता. तिचे अनेक तास प्रवासात जात असल्याने ती खूपच थकत असे. रोजच्या प्रवासाचा तिला कंटाळाच आला होता. त्यामुळे पंखुरीने आता कांदिवली परिसरात एक फ्लॅट घेतला असून तिथे ती एकटी राहात आहे. पंखुरी अनेक वर्षांपासून पालकांसोबतच राहात असल्याने तिने घर सोडल्यावर तिच्या पालकांना वाईट वाटले आहे का असा अनेकांना प्रश्न पडला आहे. तर यावर पंखुरी सांगते, "क्या कसूर है अमला का या मालिकेत मी प्रमुख भूमिका साकारत असल्याने माझ्यावर कामाचा प्रचंड त्राण येतो आणि त्यात प्रवासालादेखील अनेक तास लागत असल्याने मी वांद्र्यावरून कांदिवलीला शिफ्ट व्हायचे ठरवले. या माझ्या नव्या घरापासून सेट जवळ असल्याने माझ्यासाठी प्रवास सोईस्कर झाला आहे." 


गोलमाल अगेन या वर्षातील सगळ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :