अभिनेता कमलेश सावंतची 'नकुशी'मध्ये एंट्री

कमलेशनं 'नकुशी'मध्ये एंट्री केली असून, या मालिकेत तो पोलिसाचीच भूमिका साकारत आहे.

अभिनेता कमलेश सावंतची 'नकुशी'मध्ये एंट्री
Published: 08 Sep 2017 01:21 PM  Updated: 08 Sep 2017 01:21 PM

'दृश्यम' या सिनेमात पोलिसाच्या भूमिकेतील अभिनेता कमलेश सावंतनं अजय देवगणची केलेली धुलाई प्रेक्षकांना नक्कीच आठवत असेल. आता स्टार प्रवाहवरील 'नकुशी' या मालिकेतील रणजित शिंदेची कमलेश धुलाई करणार आहे. कारण, कमलेशनं 'नकुशी'मध्ये एंट्री केली असून, या मालिकेत तो पोलिसाचीच भूमिका साकारत आहे.'नकुशी' या मालिकेत बऱ्याच घडामोडी झाल्या आहेत. नकुशीचं मिस कॅरेज झाल्याचा धक्का रणजित पचवू शकलेला नाही. त्यामुळे तो वाईट मार्गाला लागला आहे. एका प्रकरणात तो पोलिसांकडून पकडला जातो. त्याचा तपास सूर्यकांत वागळे या पोलिस इन्स्पेक्टरकडे असतो. या तपासादरम्यान सूर्यकांत वागळे रणजित शिंदेची धुलाई करतो. कमलेश आतापर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्यानं पोलिसाचीही भूमिकाही अनेकदा केली आहे. रफटफ लुक आणि उत्तम अभिनय ही कमलेशची खासियत आहे.आता रणजितनं नेमकं काय केलेलं असतं म्हणून तो पकडला जातो, पोलिसांकडून झालेल्या धुलाईचा रणजित बदला घेतो का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं 'नकुशी' या मालिकेच्या पुढच्या भागांमध्ये मिळणार आहेत.या मालिकेने देखील खूप कमी कालावधीत प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. मालिकेची कथा आणि अनुभवी कलाकार यामुळे मालिका रसिकांचे फुल ऑन मनोरंजन करत आहे.रसिकांनाही मालिकेला दिलेले भरभरून प्रेमामुळेच वेगवगेळे नाविन्य आणण्याचा मालिकेच्या टीमचा प्रयत्न असतो.या मालिकेतदखील ग्रामीण भाषेचा तडका पाहायला मिळत आहे.मुलगाच हवा या आग्रहामागे मुलगी नको हे अलिखित विधान असतं.अशा वेळी मुलगी झाली की चक्क तिचं नावच नकुशी ठेवण्याची प्रथा ग्रामीण भागात आहे. त्यामुळे या मालिकेचे चित्रिकरणदेखील सातारा, वाई, कुडाळ या ग्रामीण भागात करण्यात आले आहे.


कंगना राणौतचा सिमरन हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :