होर्न ओके प्लीज या वेबसिरिजमध्ये झळकणार इशा केसकर आणि विराज कुलकर्णी

होर्न ओके प्लीज या वेबसिरिजमध्ये इशा केसकर आणि विराज कुलकर्णी मुख्य भूमिकेत असून या वेबसिरिजची निर्मिती मनवा नाईकने केली आहे.

होर्न ओके प्लीज या वेबसिरिजमध्ये झळकणार  इशा केसकर आणि विराज कुलकर्णी
Published: 23 Feb 2018 04:35 PM  Updated: 23 Feb 2018 04:35 PM

अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती अशा वेगवेगळ्या क्षेत्रात यश मिळाल्यानंतर आता मनवा नाईक एका वेगळ्या क्षेत्राकडे वळली आहे. मनवा आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर दिसणार आहे. तिने एका वेबसिरिजची निर्मिती केली आहे. होर्न ओके प्लीज असे तिच्या वेबसिरिजचे नाव असून यात इशा केसकर आणि विराज कुलकर्णी मुख्य भूमिका साकारणार आहेत. इशाला जय मल्हार या मालिकेमुळे लोकप्रियता मिळाली. तिने या मालिकेत बानू ही भूमिका साकारली होती. 
होर्न ओके प्लीज या वेबसिरिजमध्ये प्रेक्षकांना एक प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. ही एक अॅक्सिडेंटल लव्ह स्टोरी असून आद्विक देशपांडे आणि गायत्री बेलवलकर या दोघांची प्रेमकथा या वेबसिरिजमध्ये दाखवली जाणार आहे. आद्विक आणि गायत्री हे दोघेही आपल्या करियरच्या मागे धावत असतात. या दोघांचा स्वभाव पूर्णपणे वेगळा असून काही कारणामुळे त्यांना एकत्र राहावे लागते. पण नियतीने त्यांच्यासाठी काही वेगळेच प्लान आखलेले असते. त्यांची प्रेमकथा कशी फुलते हे होर्न ओके प्लीजमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 
होर्न ओके प्लीज या वेबसिरिजचे डी.ओ.पी. अमोल गोळे असून त्यांनी आजवर मराठी चित्रपटसृष्टीत खूप चांगले काम केले आहे. या वेबसिरिजचे दिग्दर्शन स्वप्ननील जयकर करणार असून स्वप्ननील हे आज मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे. मनवासोबतच या वेबसिरिजची निर्मिती वृषाली शिंदे आणि शिवांगी केणी करत आहेत. 
मनवा नाईकने आजवर अनेक मराठी चित्रपटात, नाटकात, मालिकांमध्ये काम केले आहे. मनवाने केवळ मराठीतच नव्हे तर हिंदीमध्ये देखील तिची एक वेगळी जागा निर्माण केली आहे. बा बहू और बेबी, तीन बहुराणीयाँ यांसारख्या मालिकांमध्ये तिने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याचसोबत तिने जोधा अकबर या हिंदी चित्रपटात देखील काम केले होते. नो एंट्री पुढे धोका आहे, जाऊ द्या ना बाळासाहेब, फक्त लढ म्हणा यांसारख्या मराठी चित्रपटातील तिच्या भूमिकांचे चांगलेच कौतुक झाले आहे. अभिनयात यश मिळाल्यानंतर मनवा दिग्दर्शनाकडे वळली. तिने पोर बाजार या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाचे तिने केलेले दिग्दर्शन प्रेक्षक आणि समीक्षक दोघांना देखील आवडले होते. दिग्दर्शनासोबत तिने निर्मितीक्षेत्रात देखील पाऊल ठेवले.

Also Read : जय मल्हारमधील इशा केसकरने काहे दिया परदेस फेम ऋषी सक्सेनाला अशा खास अंदाजात दिल्या व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :