​ये मोह मोह के धागे या मालिकेत एजाज खानचा दिसणार नवा लूक

​ये मोह मोह के धागे या मालिकेत एजाज खानचा नवा लूक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेत तो एक सरपंचाची भूमिका साकारत आहे. एका सरपंचाची आणि एका शहरातील मुलीची प्रेमकथा या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

​ये मोह मोह के धागे या मालिकेत एजाज खानचा दिसणार नवा लूक
Published: 20 Mar 2017 05:32 PM  Updated: 20 Mar 2017 05:32 PM

एजाज खानने कही तो होगा या मालिकेपासून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर केसर, कुसूम, क्योंकी साँस भी कभी बहू थी, काव्यांजली यांसारख्या मालिकांमध्ये तो झळकला. तो गेल्या वर्षी मेरी आवाज ही पहचान है या मालिकेत झळकला होता. तसेच त्याने मोठ्या पडद्यावरही आपले नशीब आजमावले आहे. त्याने कुछ ना कहो, तनू वेड्स मनू, तनू वेड्स मनू रिटर्न्स यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता तो कित्येक महिन्यांनंतर ये मोह मोह के धागे या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. या मालिकेत एजाजचे एक वेगळेच रूप प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेत तो गुजरातमधील  एका गावातील एका सरपंचाची भूमिका साकारणार आहे. या मालिकेत एक प्रेमकथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून ही प्रेमकथा खूपच वेगळी आहे. शहरात वाढलेली एक मुलगी आणि गावातील सरपंच यांच्यातील ही प्रेमकथा आहे. सामाजिक बंधनांना झुगारून देणारे हे जोडपे असून ही प्रेमकथा प्रेक्षकांना खूप आवडेल अशी या मालिकेच्या टीमला खात्री आहे. गावात राहाणाची एक व्यक्ती आपल्यासाठी मुलगी पाहात असते आणि त्यासाठी त्याला शहरातील एक मुलगी मदत करत असते. पण या दरम्यान ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात अशी या मालिकेची कथा आहे. या मालिकेत बेनाफ दादाचंदजीदेखील प्रमुख भूमिका साकारत आहे. 
एजाजने बालाजी टेलिफ्लिम्ससोबत त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. मला काहीही अभिनय येत नसताना एकताने मला तीन वर्षांसाठी साइन केले यासाठी मी एकता कपूर यांचा नेहमी आभारी राहीन असे तो सांगतो. 




पद्मावती चित्रपटाला होत असलेला विरोध योग्य आहे असे तुम्हाला वाटते का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :