​गर्ल्स हॉस्टेलच्या सेटवर दिवाळीची धमाल...

​गर्ल्स हॉस्टेलच्या सेटवर नुकतीच सगळ्यांनी मिळून दिवाळी साजरी केली. सर्वांनी दिवाळीच्या तयारीसाठी कामाच्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या होत्या. कोणी कंदील बनवला तर कोणी पणत्या लावल्या, कोणी रांगोळी सजवली तर कोणी गोडाचे पदार्थ बनवले.

​गर्ल्स हॉस्टेलच्या सेटवर दिवाळीची धमाल...
Published: 17 Oct 2017 09:58 AM  Updated: 17 Oct 2017 09:58 AM

दीपावली म्हणजे दिव्यांची माळ. म्हणूनच याला दिव्यांचा उत्सव (फेस्टिव्हल ऑफ लाईट) असेही म्हणतात. दिवाळी जवळ आली की घराची साफसफाई केली जाते. रंगरंगोटी, सजावट केली जाते. नवीन कपडे घेतले जातात. चिवडा, लाडू, चकल्या, करंजी, शंकरपाळे असे फराळांचे पदार्थ केले जातात. घरासमोर सुंदर सुंदर रांगोळ्या काढल्या जातात. संध्याकाळी पणत्या लावल्या जातात. विद्युत रोषणाईने घर उजळले जाते. झी युवावरील ‘गर्ल्स हॉस्टेल’वर सुद्धा दिवाळीची धमाल अनुभवयाला मिळाली.  या मालिकेतील कलाकारांनी दिवाळीची एक रंगतदार संध्याकाळ अनुभवली. प्रियांका, तन्वी, मालती, वल्लरी, ध्यानलक्ष्मी, सागरिका, वनिता,  बीना, सारा, दुर्गा आणि त्याचप्रमाणे विभव, सेतू, महाजन काका, इन्स्पेक्टर जाधव या सर्वांनी दिवाळीच्या तयारीसाठी कामाच्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या होत्या. कोणी कंदील बनवला तर कोणी पणत्या लावल्या, कोणी रांगोळी सजवली तर कोणी गोडाचे पदार्थ बनवले आणि शेवटी सगळ्यांनी एकत्र येऊन दिवाळी सण साजरा केला.
स्वतःला सिद्ध करण्यासाठी सारा, प्रियांका, तन्वी, मालती, वल्लरी, ध्यानलक्ष्मी, सागरिका, नेहा  आणि वनिता या पुणे, नाशिक, पंढरपूर, मराठवाडा अशा आणि इतर वेगवेगळ्या शहरांतून  आलेल्या मुली सावित्री गर्ल्स हॉस्टेलमध्ये एकमेकींच्या सानिध्यात मजेत राहत होत्या. रोजच्या आयुष्यातील संघर्ष करत असतानाच हॉस्टेलच्या भिंतीच्या आत मात्र त्यांना प्रचंड सुरक्षित वाटतं होतं. सावित्री गर्ल्स हॉस्टेल मधील या मुलींना सगळ्यात मोठा आधार होता तो एकमेकींचा, एकमेकांबरोबर असण्याचा आणि त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात सुरक्षित हक्काची जागा होती त्यांचे सावित्री गर्ल्स हॉस्टेल. मात्र याच त्यांच्या सावित्री गर्ल्स हॉस्टेलच्या सुरक्षित जगात अतिशय भयानक घटना घडायला लागल्या आहेत, ज्यामुळे या मुलींच्या आयुष्यातील धमाल मस्ती संपून त्याची जागा थरकाप उडवणाऱ्या भयाने घेतली आहे. गूढ घटनांची साखळी वाढू लागलीय आणि त्यानंतर सुरू झालंय एक अनाकलनीय प्रसंगांचे भयंकर चक्र! या सर्व मुली एक एक करून या चक्रात गुरफूटल्या जात आहेत. प्रथम सारा आणि आता नेहाच्या अनपेक्षित जाण्याने तिथे कोणीतरी आहे ही भावना सगळ्यांच्या मनात निर्माण होऊन हॉस्टेलमध्ये एक भीतीचे सावट निर्माण झालंय.
या मालिकेची कथा प्रसिद्ध लेखक शेखर ढवळीकर आणि पटकथा अभिनेता लेखक चिन्मय मांडलेकर यांची आहे तर संवाद कुमुद इतराज यांचे आहेत. 

Also Read : गर्ल्स हॉस्टेल मालिकेला मिळणार एक वळण


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :