​सरस्वतीचा नवा लूक तुम्ही पाहिला का?

​सरस्वती या मालिकेत आता सरस्वती प्रेक्षकांना पुन्हा एकदा जुन्या लूकमध्ये पाहायला मिळणार आहे. ती राघवच्या वाड्यात आता एक मोलकरीण म्हणून येणार आहे.

​सरस्वतीचा नवा लूक तुम्ही पाहिला का?
Published: 10 Jul 2017 02:11 PM  Updated: 10 Jul 2017 02:11 PM

सरस्वती मालिकेमध्ये राघव परतल्यानंतर सरस्वतीच्या आयुष्यात बऱ्याच घटना घडल्या. सरस्वतीला राघवच्या रागाचे आणि त्याच्या विचित्र वागण्याचे कारण कळत नव्हते. पण राघवनेच त्याच्या विचित्र वागण्याचे कारण सरस्वतीला सांगितले आहे. यामुळे आता राघवच्या मनातला गैरसमज कसा दूर करावा हेच तिला कळत नाही. राघवच्या मनामध्ये सरस्वतीबद्दल अतिशय वाईट गोष्टी भरवून देण्यात आल्या आहेत. सरस्वतीनेच राघवला मारण्याचा प्रयत्न केला आहे असे राघवला सांगण्यात आले आहे. त्यामुळे तो सरस्वतीशी खूप वाईट वागायला लागला आहे. त्याने तिला वाड्याच्या बाहेर देखील काढले आहे आणि तिच्याशी असलेले नाते तोडले आहे. पण या कठीण काळामध्ये सरस्वतीचा मित्र हनी मात्र तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. सरस्वतीने हनीच्या सांगण्यावरून पुन्हा वाड्यामध्ये येण्याचा निर्धार केला आहे. पण सरस्वती आता तिच्या जुन्या लुकमध्ये मालिकेमध्ये परतणार आहे. या बदलामुळे मालिकेमध्ये रंजक वळण येणार आहे.
सरस्वतीला राघवने वाड्याबाहेर काढले आहे. त्यात मामा देखील वाड्याबाहेर आहे आणि या सगळ्यात घराचा नोकरसुद्धा आता काम सोडून गेला आहे. त्यामुळे सगळ्या कामाची जबाबदारी विद्युलवर आली आहे. त्यामुळे तिने घरकामासाठी नोकर शोधण्याची जबाबदारी हनीवर सोपवली आहे. हनी आणि सरस्वतीच्या प्लानिंगप्रमाणे हनी वाड्यामध्ये दोन-तीन नोकर आणणार आहे आणि त्यांना तो एक ते दोन दिवसात पळवून लावणार आहे. त्यानंतर सरस्वतीला कामाची गरज आहे. त्यामुळे आपण तिलाच वाड्यामध्ये नोकर म्हणून आणू असे हनी विद्युलला सांगणार आहे आणि त्यानुसार सरस्वती वाड्यामध्ये परतणार आहे. ती आता सरस्वती विश्राम मोरे म्हणून येणार आहे. सरस्वतीने आता काहीही करून मोठ्या मालकांचा विश्वास परत मिळवण्याचे आणि सत्य मोठ्या मालकांच्या समोर आणण्याचे ठरवले आहे.
सरस्वती वाड्यावर परतल्यानंतर राघवच्या रागाला आणि तिरस्काराला सामोरी जाणार यात काही शंकाच आहे. पण आता ती वाड्यात येऊन विद्युलच्या कारस्थानांना कशी उत्तरे देते हे पाहाणे रंजक ठरणार आहे.


पद्मावती चित्रपटाला होत असलेला विरोध योग्य आहे असे तुम्हाला वाटते का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :