​आणि नृत्य सादर करताना दयाचा पायझमा फाटला

गोल्ड अवॉर्ड पुरस्कार सोहळ्यात नृत्य सादर करत असताना नुकताच दयानंद शेट्टी म्हणजेच दयाचा पायझमा फाटला. पण त्याही अवस्थेत त्याने नृत्य सादर केले.

​आणि नृत्य सादर करताना दयाचा पायझमा फाटला
Published: 13 Jul 2017 04:38 PM  Updated: 13 Jul 2017 04:38 PM

दयानंद शेट्टी हा प्रेक्षकांना दया याच नावाने चांगला माहीत आहे. सीआयडी या मालिकेतील दरवाजा तोडणारा दया तर प्रेक्षकांचा प्रचंड लाडका आहे. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकजण त्याचे फॅन आहेत. सीआयडी या मालिकेत तो जवळजवळ 18 वर्षांपासून काम करत आहे. याचदरम्यान दयाने गुटर गूँ, तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकांमध्ये काम केले होते. या मालिकांमध्ये त्याचा वेगळा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. आता दया प्रेक्षकांना एका नव्या रूपात दिसणार आहे. दया आता डान्सर म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
दया गोल्ड अवॉर्ड पुरस्कार सोहळ्यात परफॉर्मन्स सादर करताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दया एका पुरस्कार सोहळ्यात वंदे मातरम या गाण्यावर नृत्य सादर करणार आहे. हा त्याचा परफॉर्मन्स नुकताच चित्रीत करण्यात आला. तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनाच हा परफॉर्मन्स प्रचंड आवडला. पण या परफॉर्मन्सच्या दरम्यान एक गंमत घडली. तिथे उपस्थित असलेल्या लोकांच्या लक्षातच आले नाही की नृत्य करताना दयाचा पायझमा फाटला. गाण्याची सुरुवात झाल्यानंतर लगेचच एक स्टेपमध्ये त्याला त्याचा पाय जोरदार आपटायचा होता. पण त्याचवेळी त्याचा पायझमा फाटला. पण तरीही त्याने आपले नृत्य थांबवले नाही. याविषयी दया सांगतो, पुरस्कार सोहळ्याच्या आदल्या दिवशी मी कपड्यांच्या फिटिंगसाठी गेलो असता मला पायझमा काही ठिकाणी खूप घट्ट होत असल्याचे मी त्यांना सांगितले होते. पण तरीही त्यांनी व्यवस्थित फिटिंग केली नाही. ही गोष्ट मला पऱफॉर्मन्स सादर करायच्या काही मिनिटे अगोदरच लक्षात आली. त्यामुळे तसेच कपडे घालण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता. मी नृत्याची पहिलीच स्टेप करताच माझा पायजमा फाटला. त्यामुळे माझ्याकडे परफॉर्मन्स सादर करत राहाण्याशिवाय पर्याय नव्हता. 

Also Read : सीआयडी फेम जान्हवी छेडा लवकरच होणार आई


पुन्हा फुलणार का सलमान खान आणि कतरिना कैफची लव्हस्टोरी?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :