'चला हवा येऊ द्या'पॅरिसमध्ये हास्याचा धुमाकूळ घालण्यास सज्ज

कॉमेडीचं हे वारं पॅरिसच्या गुलाबी हवेलाही गुदगुल्या करत आपल्या रंगात रंगवण्यासाठी सज्ज आहे.

'चला हवा येऊ द्या'पॅरिसमध्ये हास्याचा धुमाकूळ घालण्यास सज्ज
Published: 18 Jan 2018 04:05 PM  Updated: 18 Jan 2018 04:05 PM

छोट्या पडद्यावरील रसिकांचा लाडका 'चला हवा येऊ द्या' आता विनोदवीरांची लंडनला निघालेलं वऱ्हाड आता लग्नाची बोलणी करुन लग्न सोहळा संपन्न करण्यासाठी आता पोहोचणार आहे रोमॅण्टिक सिटी पॅरीसला.श्रेया आणि टीमनं पॅरिसच्या प्रसिद्ध अशा आयफेल टॉवरलाही भेट दिली.याशिवाय लंडन आणि पॅरिसमधील विविध ठिकाणी जात चला हवा येऊ द्या शोच्या टीमनं परदेशवारीचा मनमुराद आनंद लुटला होता.याच परदेशवारीचे विविध फोटोसुद्धा श्रेयानं सोशल मीडियावर शेअर केले होते.'चला हवा येऊ द्या'च्या मागच्या आठवड्यातील भागांमध्ये आपण पाहिलं की थुकरवाडीतली ही इरसाल मंडळी लंडनला पोहोचली होती.लंडनमध्ये एका इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलीशी गुलाब अर्थात भाऊ कदमचं लग्न लागणार आहे.मुलीच्या भावाने सारखपुड्याची भेट म्हणून या वऱ्हाडाला पॅरिसच्या सफरीला पाठवलं आहे.लग्नाची पुढची तयारीही पॅरीसमध्ये होणार आहे.आता पॅरिसमध्ये आयफेल टॉवरच्या समोर हा लग्नसोहळा पार पडणार आहे.पण या लंडनवाल्या नकटीच्या लग्नातही सतराशे विघ्न आहेतच.या लग्नसोहळ्याची धमाल आपण येत्या सोमवार आणि मंगळवारच्या भागात पाहायला मिळणार आहे.विश्वदौऱ्यावर निघालेली 'चला हवा येऊ द्या'ची टीम येत्या सोमवारी आणि मंगळवारी म्हणजेच २२ आणि २३ जानेवारीला,झी मराठीच्या प्रेक्षकांना घडवणार आहे पॅरिसची सफर.पॅरिसचा 'आयफेल टॉवर','शॅतो दे शॅन्तेली पॅलेस','फ्रॅगोनार्ड परफ्युम म्युझियम' अशा वेगवेगळ्या ठिकाणांची सफर घर बसल्या तुम्हाला होणार आहे.गुलाब आणि अँजेलिना पॅट्रिकच्या लग्नसोहळ्यातले अनेक छोटे मोठे समारंभ आणि लग्नाची बोलणी पॅरिसच्या 'शॅतो दे शॅन्तेली' या राजवाड्यात पार पडणार आहेत.तर हा आगळावेगळा लग्नसोहळा अगदी खास मराठी पद्धतीने पार पडणार आहे. तो सुद्धा भव्य दिव्य आयफेल टॉवरच्या साक्षीने.जिथे मराठी तिथे झी मराठी म्हणत थुकरटवाडीतला गुलाब आणि त्याचं कुटुंब जगाच्या कानाकोपऱ्यात मराठी पोहोचवत आहेत.दुबई,लंडननंतर पॅरिसला पोहोचलेली ही वारी इथेही धुमाकूळ घालणार आहे.कॉमेडीचं हे वारं पॅरिसच्या गुलाबी हवेलाही गुदगुल्या करत आपल्या रंगात रंगवण्यासाठी सज्ज आहे.

पॅरिसनंतर विनोदवीरांनी जपान टूरचे काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत.त्यात त्यांनी जपानच्या टूरविषयी माहिती सांगितली आहे.तसेच शेअर केलेल्या फोटोत विनोदवीर या सुट्टीचा पुरेपूर आनंद घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. 


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :